व्हिडीओ गेम बनवत बनवत बनला कोट्याधीश; असा आहे एलॉन मस्कचा प्रवास

टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) आज 51 वर्षांचे झाले.
Elon Musk
Elon Musksakal

टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) आज 51 वर्षांचे झाले. लहानपणी व्हिडिओ गेम्सचा शोध लावणारा ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापर्यंतचा इलॉन मस्कचा प्रवास खूप रंजक आहे.

इलॉन मस्क यांचा जन्म 28 जून 1971 रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे झाला. त्याचे पूर्ण नाव इलॉन रीव्ह मस्क आहे. त्याची आई कॅनडाची होती तर वडील दक्षिण आफ्रिकेचे होते. वडील एरोल मस्क इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि पायलट होते, तर आई मे मस्क डायटीशियन होत्या. (Elon musk birthday)

Elon Musk
Video | बुलफायटींगच्या वेळी अचानक मंडप कोसळले, दोघांचा मृत्यू व ६० जण जखमी

आई वडिलांच्या घटस्फोटानंतर इलॉन मस्क आपल्या वडिलांसोबत राहू लागला. त्यांचे सुरवातीचे शिक्षण दक्षिण आफ्रिकेत झाले. यानंतर उच्च शिक्षणासाठी 1988 मध्ये कॅनडाचा पासपोर्ट मिळवून त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडली.

मस्कने फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी मिळवली आणि कॅलिफोर्नियाला गेले. येथे त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीसाठी हजेरी लावली, परंतु ती पूर्ण केली नाही.

Elon Musk
मोदी G7 परिषदेत असताना मोठा निर्णय, Twitter कडून पाकिस्तानी दूतावासांवर बंदी

मस्क लहानपणापासूनच खूप अॅक्टीव्ह होता. मस्क याला संगणकाची आवड होती आणि वयाच्या 10 व्या वर्षी त्याने कम्पूटर प्रोग्रामिंग शिकले. यानंतर वयाच्या 12 व्या वर्षी त्याने 'ब्लास्टर' नावाचा व्हिडिओ गेम बनवून त्यातून कमाई करण्यास सुरुवात केली. मस्कने त्याचा तयार केलेला व्हिडिओ गेम एका अमेरिकन कंपनीला फक्त $500 मध्ये विकला.

व्हिडीओ गेम्स बनवण्यास सुरुवात केल्यानंतर एलोन मस्कने मागे वळून कधीच पाहिले नाही. वयाच्या 27 व्या वर्षी मस्कने 'X.com' नावाची कंपनी सुरू केली. 1995 मध्ये Zip2 नावाची टेक कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांला यश मिळाले. यानंतर 2004 मध्ये त्यांनी टेस्ला ही इलेक्ट्रिक कार कंपनी सुरू केली.

Elon Musk
Russia Ukraine War : युक्रेनसाठी आता 'जी ७' एकवटलं; रशियाविरोधात कसली कंबर

सध्या टेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. यासोबतच मस्क हे SpaceX चे CEO देखील आहेत. अलीकडेच, त्याने जवळपास 3 लाख 45 हजार कोटींहून अधिक किमतीमध्ये ट्विटर विकत घेण्याचा करार केला आहे, जो टेक जगतातील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा करार आहे.

फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या आकडेवारीनुसार इलॉन मस्क 234 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एकेकाळी मस्कला इंटरनेट कंपनीने नोकरी नाकारली होती आणि आज तो जगाला सॅटेलाइट इंटरनेट देत आहे. मंगळ ग्रहावर इलॉनला मानवी वस्ती स्थापन करायची आहे. इलॉनचे इंटरनेटबद्दल वेगळे मत होते आणि ते म्हणाले की इंटरनेटमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com