पुतिन यांना आव्हान देणारे मस्क धमक्यांना घाबरले? नाव बदलले

elon musk challenges Vladimir putin
elon musk challenges Vladimir putin elon musk challenges Vladimir putin

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दोन हात करण्याचे आव्हान दिले होते. आता त्यांनी ट्विटरवर त्यांचे डिस्प्ले नाव बदलले आहे. डिस्प्ले नाव बदलून ‘एल्ना मस्क’ केले आहे. (Elon Musk Changed the Name on twitter)

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान दिले तेव्हा पुतिन (Vladimir Putin) यांच्या अनेक समर्थकांनी ट्विटरवर इलॉन मस्क (Elon Musk) यांना धमक्याही दिल्या. यापैकी एकामध्ये चेचन रिपब्लिकचे प्रमुख रमझान कादिरोव्ह यांचा समावेश होता. कादिरोव्हने मस्कला इशारा दिला की, पुतिनविरुद्ध तुमची ताकद मोजू नका. तुम्ही दोघे पूर्णपणे वेगळ्या लीगमध्ये आहात. तुम्हाला स्नायू पंप करावे लागतील जेणे करून नाजूक इलॉन ते क्रूर इलॉनमध्ये बदलू शकाल, जे तुम्हाला हवे आहे.

इलॉन मस्क यांनीही कादिरोव्हच्या धमकीला (threat) प्रत्युत्तर दिले. या ऑफरसाठी धन्यवाद. परंतु, असे उत्तम प्रशिक्षण माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते लढायला घाबरत असतील तर मी लढाईत फक्त डावा हात वापरायला तयार आहे. मी डावखुरा नसताना, असे उत्तर मस्क यांनी दिले होते. यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विटरवर आपले डिस्प्ले नाव बदलून ‘एल्ना मस्क’ असे केले.

elon musk challenges Vladimir putin
एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; म्हणाले...

ते उघडपणे युक्रेनच्या समर्थनात

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून इलॉन मस्क (Elon Musk) हे पुतिनवर (Vladimir Putin ) बोलत आहे. एवढेच नाही तर युक्रेनला मदत करण्यासाठी त्यांनी स्टारलिंक या उपग्रहाचा वापर करण्यासही परवानगी दिली आहे. ते उघडपणे युक्रेनच्या समर्थनात आहेत. आपल्या ट्विटरवरील विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे मस्क यांनी युक्रेनला ठोस मार्गांनी पाठिंबा दिला आहे.

वादाचा स्क्रीनशॉटही केला शेअर

इतकेच नाही तर ‘एल्ना मस्क’ने या वादाचा स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्याचे नाव एल्ना असे लिहिले आहे. हे ट्विट व्हायरल होताच लोकांनी इलॉन मस्कच्या बुद्धीचे कौतुक करायला सुरुवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com