एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; म्हणाले...

eknath khadase
eknath khadaseeknath khadase

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बेनामी मालमत्ता विकत घेतल्याच्या आरोपात महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. नवाब मलिक २१ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहे. यामुळेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते. माझेही संबंध जोडले गेले, असे म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी खरेदी केलेल्या काही मालमत्ता या दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मार्फत खरेदी केल्या आहेत. या मालमतांची किंमत कोट्यवधींची आहे. त्यामध्ये बेकायदेशीरपणे व्यवहार केले आहेत. ही रक्कम दाऊदपर्यंत पोहचविण्यात आली आहे, असा दावा ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी ईडीने (ED) त्यांच्यावर कारवाई केली आहे.

eknath khadase
झेलेन्स्कीचे मोठे विधान; आम्ही नाटोमध्ये सहभागी होणार नाही

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकरसह (IQbal Kaskar) अन्य व्यक्तींची चौकशी केली. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाली.

२३ फेब्रुवारीला नवाब मलिकांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ईडीने आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली होती. त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. नवाब मलिक हे २१ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहे. यामुळेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते. माझेही संबंध जोडले गेले, असे म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

eknath khadase
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

सीडी योग्यवेळी बाहेर येईल

एक सीडी माझ्याकडेही आहे. मी सीडी बाहेर काढेल असे म्हटले होते. परंतु, वेळ सांगितली नव्हती. मी सीडी नक्की बाहेर काढेल. आता ती वेळ आलेली नाही, असे मला वाटते. योग्य वेळ आल्यावर नक्की सीडी बाहेर काढेल असेही एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

मी अनेक सीडी बघितल्या

सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह दिल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तरही दिले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची एजन्सी काढली का? असेही गृहमंत्री म्हणाले होते. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मी असे अनेक सीडी आणि पेनड्राईव्ह बघितले आहे. त्यातून काय सत्य येते हे मला माहिती आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com