Elon Musk Tweet : 'माझ्याबद्दल वाटेल ते बोला, पण…'; अक्कल शिकवणाऱ्यांना मस्कचा खोचक टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elon musk funny tweet about himself calls twitter worlds largest non profit

Elon Musk Tweet : 'माझ्याबद्दल वाटेल ते बोला, पण…'; अक्कल शिकवणाऱ्यांना मस्कचा खोचक टोला

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक उद्योगपती इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केली. यावरून बरेच दिवस मस्क चर्चेत होते.

ट्विटरमध्ये 9.2 टक्के शेअर्स विकत घेतल्यानंतर ते या मायक्रोब्लॉगिंग साइटचे सर्वात मोठे स्टेकहोल्डर बनले. दरम्यान वेगवेगळ्या ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मस्क यांनी आता पुन्हा एकदा ट्वीट करत स्वतःचीच खिल्ली उडवली आहे.

टेस्ला कंपनीचे सीईओ असलेल्या मस्क यांनी ट्वीट करत स्वत: ची मजा घेतली आहे. ट्विटरचा उल्लेख करत जगातील सर्वात मोठी 'ना नफा' कंपनी असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे. नेटकरी देखील यावर भरभरून कमेंट्स करत आहेत.

ट्वीटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क यांच्यावर ते चालवण्याच्या पध्दतीवरून बरीच टीका झाली होती. अनेकांनी मस्क ट्विटरला संपवणार, ट्विटर मरत आहे असेही म्हटले. ही टीका अजूनही होत असते. यावर मस्क यांनी खोचक टोला लगावला.

लोकांकडून होत असलेल्या या सगळ्या टिकेला उत्तर देत मस्क यांनी मजेशीर ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, 'तुम्ही माझ्याबद्दल वाटेल ते बोला, पण मी $44B देऊन जगातील सर्वात मोठी 'नो प्रोफीट' कंपनी घेतलीय.' मस्क यांच्या या ट्विटला 30 मिलीयनहून अधिक इंप्रेशन्स आणि 3 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

गेल्या वर्षी इलॉन मस्कने ट्विटर 44 अब्ज डॉलरला विकत घेतले. याअधिग्रहणानंतर, मस्क यांनी कंपनीच्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. मस्कने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरमध्ये देखील अनेक बदल केले आहेत.

टॅग्स :TwitterElon Musk