बापरे! ट्विटरसाठी मस्कनं दिवसाला गमावले 2500 कोटी रुपये : Elon Musk Loss | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk director of Twitter

Elon Musk Loss: बापरे! ट्विटरसाठी मस्कनं दिवसाला गमावले 2500 कोटी रुपये

नवी दिल्ली : एव्हाना आपल्या सगळ्यांना माहितीए की, ट्विटरची मालकी आता इलॉन मस्क यांच्याकडे गेली आहे. पण ट्विटरची मालकी मिळवणं मस्क यांच्यासाठी काही सोपं नव्हतं.

ट्विटरवर संपूर्ण मालकी मिळवण्यासाठी त्यांना जो कायदेशीर लढा द्यावा लागला त्यासाठी वर्षभरात दिवसाला तब्बल २,५०० कोटी रुपये त्यांना गमवावे लागले. त्यामुळं त्यांचं एकूण १०१ बिलियन डॉलरचं नुकसान झालं. (Elon Musk has lost Rs 2500 Crore daily this year as he fights to gain total control of Twitter)

हेही वाचा: European Parliament Vs Russia: यूरोपियन संसदेकडून रशिया 'दहशतवादाचा प्रायोजक देश' घोषित

इलॉन मस्क यांच्या संपत्तीबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये म्हटलंय की, सन २०२२ मध्ये मस्क यांच्या संपत्तीत १०१ बिलियन अमेरिकन डॉलरची घट झाली. त्यामुळं मस्कच्या संपत्तीत दिवसाला २५०० कोटी रुपयांची तोटा झाला. नोव्हेंबर २०२२ पर्यंत मस्क यांची निव्वळ संपत्ती १७० बिलियन डॉलर होती, ब्लुमबर्गच्या वेल्थ इंडेक्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: Photos : मुंबईत पहिल्यांदा दिसलं व्हेल माशासारखं भव्य विमान!

अनेक अडचणी आणि तोटा केला सहन

मस्क यांच्याकडे सध्या पाच विविध कंपन्यांची मालकी आहे. यामध्ये टेस्ला आणि ट्विटरचाही समावेश आहे. या वर्षी मस्कला बराच फटका सहन करावा लागला तोही ट्विटरमुळं. काही महिन्यांपूर्वी मस्क ट्विटर विकत घेणारं असल्याचं बोललं जात होतं पण अचानक त्यांनी कायदेशीर आव्हानं निर्माण झाल्यानं या डीलमधून माघार घेतल्याच्या बातम्याही आल्या. पण ट्विटर अखेर ताब्यात घेतल्यानंतर त्यात बदल करण्यात ते बराच व्यस्त राहिले.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

दरम्यान, मस्क यांनी ट्विटरच्या ६० ते ७० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. १२०० इंजिनिअर्सनी देखील स्वतःहून कंपनीचा राजीनामा दिला. त्याचबरोबर ट्विटरचा पूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी मस्कनं ट्विटरच्या संचालक मंडळाला देखील काढून टाकलं. अखेर त्यां ४४ बिलियन अमेरिकन डॉलरमध्ये ट्विटरचा व्यवहार पूर्ण केला.