टेस्ला कार भारतात येणार नाही? एलॉन मस्कच्या ट्विटची चर्चा | Elon Musk and Tesla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk
टेस्ला कार भारतात येणार नाही? एलॉन मस्कच्या ट्विटची चर्चा

टेस्ला कार भारतात येणार नाही? एलॉन मस्कच्या ट्विटची चर्चा

एलॉन मस्कची बहुचर्चित आणि प्रसिद्ध कार कंपनी टेस्ला भारतात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण टेस्ला भारतात नक्की कधी येणार याबाबत अनेक संभ्रम आहेत. अनेक भारतीयांनाही या कारची प्रतिक्षा आहे. या सगळ्यातच आता खुद्द एलॉन मस्कनेच टेस्ला भारतात कधी येणार याचं उत्तर दिलं आहे. (Elon Musk about launching Tesla cars in India)

एलॉन मस्कच्या (Elon Musk) निर्णयामुळे आता भारतीयांना टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारसाठी अधिक काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. भारत जोपर्यंत टेस्लाने(Tesla Cars in India) बनवलेल्या कार भारतात विकण्याची परवानगी देत नाही, तोवर भारतात नव्या कार बनवणार नसल्याचं सांगितलं आहे. मस्कने शुक्रवारी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे आता टेस्ला कार वापरण्याच्या इच्छेला लगाम लागणार आहे.

हेही वाचा: अखेर टेस्लाचे भारतात आगमन; एलॉन मस्क यांची महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्याला पसंती

भारत सरकारने (Government of India) टेस्लाला परवानगी देण्यासाठी अट ठेवली आहे. टेस्ला फक्त भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक गाड्याच भारतात विकू शकेल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे टेस्ला आणि भारत सरकार यांच्यातला करार रखडला आहे. टेस्लाला भारतात कार विकायच्या असतील तर भारतात कारखान सुरू करावा लागेल, अशी अट भारत सरकारने घातली आहे. चीनमध्ये बनवलेल्या टेस्लाच्या कार भारतात विकल्या जाणार नाहीत, असं भारतानं स्पष्ट केलं आहे.

Web Title: Elon Musk New Tweet About Tesla Cars In India Indian Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Elon MuskTesla
go to top