esakal | सर्वाधिक श्रीमंत झाल्यानंतर इलॉन मस्क यांचा हटके रिप्लाय; जेफ बेजोस यांना मागे टाकत म्हटलं...
sakal

बोलून बातमी शोधा

Elon must rechest person

काल गुरुवारी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि त्यानंतर एलॉन मस्क हे थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.

सर्वाधिक श्रीमंत झाल्यानंतर इलॉन मस्क यांचा हटके रिप्लाय; जेफ बेजोस यांना मागे टाकत म्हटलं...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय. टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलं आहे. गुरुवारी, 7 जानेवारी 2021 रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि मस्क थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकून इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीने 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक संपत्तीचा टप्पा गाठला आहे. इलॉन मस्क यांच्या टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे त्यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलं आहे. काल गुरुवारी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि त्यानंतर एलॉन मस्क हे थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.

हेही वाचा - बदायूं हत्याकांड : 50 हजाराचे बक्षिस लावलेल्या फरार पुजाऱ्याला अटक; गावातच बसला होता लपून

याआधी 2017 सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते आता मागे पडले असून हे स्थान आता इलॉन मस्क यांनी पटकावलं आहे. इलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचं मूल्य यावर्षी प्रचंड वाढलं आहे. गेल्या मंगळवारी म्हणजेच 5 जानेवारी रोजी टेस्लाची Market Value पहिल्यांदाच 700 बिलियन डॉलरवर पोहोचली होती. विशेष म्हणजे, टेस्लाची ही Market Value टोयोटा, फोक्सवॅगन, ह्युंदाई, जनरल मोटर्स आणि फोर्ड यांच्या एकत्रित केल्यानंतरच्या Market Value पेक्षाही जास्त झाली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली. त्यावर इलॉन मस्क अगदी हटके प्रतिक्रीया दिली. त्यांनी आपल्या खास अशा शैलीतच या ट्वीटला दोन रिप्लाय दिले. पहिला ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, 'हाऊ स्ट्रेंज' आणि त्यांची दुसरी प्रतिक्रिया होती, 'वेल, बॅक टू वर्क'...

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जेफ बेजोस यांची संपत्ती वाढतच आहे. त्यात कोरोनाच्या काळात तर अमेझॉनला अधिक प्रतिसाद मिळाला होत. मात्र, जेफ बेजोस यांनी घटस्फोटानंतर पत्नीला आपल्या संपत्तीतला चार टक्के वाटा दिला होता. याच कारणामुळे इलॉन मस्क यांना बेजोस यांच्या पुढे जाता आलं आहे.

loading image