इलॉन मस्क आता स्मार्टफोनही लाँच करणार; ॲपल-सॅमसंगला देणार थेट टक्कर!

Elon Musk.
Elon Musk.sakal

नवी दिल्ली - ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांना ज्या-ज्या गोष्टी त्रास देतात त्या सर्वविकत घेण्याचा धडाका मस्क यांनी लावला आहे. जगातील सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरच्या फेक अकाऊंटची इलॉन मस्क यांना अडचण होती. त्यामुळे त्यांनी थेट ट्विटरच विकत घेतलं. आता ते सतत ट्विटरमध्ये बदल करत आहेत. (elon musk news in Marathi)

Elon Musk.
Viral Video : याला म्हणतात असली बाहुबली, चक्क दुचाकी डोक्यावर घेऊन चढला एसटीच्या टपावर

ट्विटवर ब्लू टिक्स फी बेस्ड करण्यासारख्या निर्णयाचा या बदलांमध्ये समावेश आहे. आता मस्क स्वत:चा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहेत. स्मार्टफोन मार्केटमध्ये मस्क यांना ॲपल, गुगल आणि सॅमसंगसारख्या बड्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ॲपलच्या वतीने एका ट्विटमध्ये आणखी एक पर्यायी फोन आणणार असल्याचं म्हटलं होत. दरम्यान ॲपल आणि गुगल प्ले स्टोअरमधून ट्विटर हटवल्याबद्दल ट्विटरवर चर्चा झाली होती, त्याला उत्तर देताना एलन मस्क यांनी फोन घेऊन या असं म्हटलं आहे..

मी आशा करतो की फोनची निर्मिती करण्याची मला गरज पडणार नाही. परंतु, दुसरा कोणताही पर्याय नसेल तर मी पर्यायी फोन बनवेन, असं एलन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काही वापरकर्त्यांनी ॲपल आणि गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल "पक्षपाती" वृत्तीचा आरोप केल्यानंतर संपूर्ण चर्चा सुरू झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com