Elon Musk
Elon MuskSakal

Elon Musk यांची Twitter विकत घेण्याची ऑफर गुंतवणुकदारांनी नाकारली

अल्वालीद यांनी मस्क यांची ऑफर नाकारल्यावर मस्क यांनी ट्वीट करत आपले काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्वीटर कंपनीला विकत घेण्यासाठी ऑफर दिली आणि जगभर याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यांनी ट्वीटर कंपनीला विकत घेण्यासाठी तब्बल ४३ बिलियन डॉलर किंमतीत विकत घेण्याची ऑफर दिली. त्यानंतर ट्वीटरचे सौदी अरेबीयातील मोठे गुंतवणुकदार आणि उद्योगपती असलेल्या तलाल अल्वालीद यांनी त्यांची ही ऑफर मान्य नसल्याचं सांगितलं.

टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी १४ एप्रिलला ट्वीटर खरेदी करण्यासाठी ट्वीटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना पत्र लिहीत ऑफर दिली होती. त्यानंतर आपल्याला ट्वीटरचे शेअर्स दर पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लगेचच अल्वालीद यांनी त्यांची ऑफर नाकारली आहे. ते म्हणाले की, कंपनीच्या वाढीच्या आणि विकासाच्या काळामध्ये मस्क यांनी ट्वीटरला ऑफर करणे याचं मला आश्चर्य वाटतंय. असं त्यांनी ट्वीट करत म्हटलंय. पुढे ते म्हणाले की, "कंपनीचा मोठा आणि दिर्घकाळ गुंतवणुकदार म्हणून मी ही ऑफर नाकारत आहे."

अल्वालीद यांच्या ट्वीटरसाठीच्या कामामुळे सौदी अरेबियातील सरकार आणि उद्योगपतींना ट्वीटरच्या संबंधात आणले आहे त्यामुळे त्यांचे कंपनीसाठी योगदान खूप मोठे आहे. ट्वीटर हे मस्क यांच्या ऑफरसाठी लढायला तयार आहे. असंही ते म्हणाले. दरम्यान मस्क यांनी ट्वीटरमध्ये काही बदल करावे लागतील कारण लोकांना मोफत व्यक्त होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचं मस्क यांनी सांगितलं.

अल्वालीद यांनी मस्क यांची ऑफर नाकारल्यावर मस्क यांनी ट्वीट करत आपले काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते ट्वीट करत म्हणतात की, हे खूप गंमतीशीर आहे. मी विचारु शकलो तर माझ्याकडे दोन प्रश्न आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ट्वीटरचं काय प्रभुत्व आहे? आणि त्यांच्या त्या व्यासपीठावर लोकांना बोलण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती आहे? असे दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान मोठ्या गुंतवणुकदारांनी ही ऑफर नाकारल्यावर ट्वीटरची मालकी मस्क यांच्याकडे जाईल का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com