Elon Musk: धडाकेबाज निर्णयांनंतर मस्क म्हणतात, ट्विटरसाठी आता वेळ नाही; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk

Elon Musk: धडाकेबाज निर्णयानंतर मस्क म्हणतात, ट्विटरसाठी आता वेळ नाही; कारण...

नवी दिल्ली - ट्विटरची खरेदी केल्यापासून उद्योगपती इलॉन मस्क सातत्याने चर्चेत आहेत. ट्विटर खरेदीचा करार झाल्यापासून मस्क यांनी अनेक बाबींवर काम केलं असून ते सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहेत. मात्र आज त्यांनी ट्विटरला आपण कमी वेळ देणार असल्याचं स्पष्ट केलं. (Elon Musk news in marathi)

हेही वाचा: आता गुन्हेगारही जावू शकणार सौदीला; पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटबाबत मोठा निर्णय

इलॉन मस्क यांनी बुधवारी सांगितले की, ट्विटरसाठी आपण कमी वेळ देणार आहोत. आपण आता कंपनी चालविण्यासाठी नवीन लीडरच्या शोधात असून तो लवकरच सापडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर या आठवड्यात एखाद्या संस्थेची पुनर्रचना पूर्ण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टेस्लाच्या गुंतवणूकदारांना आता काळजी वाटत आहे की मस्क ट्विटरचा कायापालट करण्यासाठी अधिक वेळ तिकडेच देतील. वास्तविक दुपारी टेस्लाच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

हेही वाचा: Congress : भारत जोडो यात्रेत 19 नोव्हेंबरला राहुल गांधींसोबत दिसणार फक्त महिला; जाणून घ्या कारण

इलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक झाल्यापासून पहिल्या दोन आठवड्यांमध्ये झपाट्याने बदल झाले आहेत. ट्विटरचे आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना नारळ दिलं आहे. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला ट्विटरच्या निम्म्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं.

टॅग्स :TwitterElon Musk