श्रीलंकेतील आणीबाणी अखेर मागे

अध्यक्षपद सोडण्यास गोटाबयांचा नकार; नागरिकांचा रोष कायम
Emergency in Sri Lanka finally receded Gotabaya Rajapaksa Colombo
Emergency in Sri Lanka finally receded Gotabaya Rajapaksa Colombosakal

कोलंबो : श्रीलंकेच्या नागरिकांचा तीव्र विरोध पाहता अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांनी काल रात्री आणीबाणी मागे घेतली. गेल्या आठवड्यात १ एप्रिल रोजी मध्यरात्री आणीबाणी लागू करण्यात आली होती. या आणीबाणीमुळे राजपक्ष यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. काल सायंकाळी हजारो विद्यार्थ्यांनी कोलंबोत भरपावसात पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. दरम्यान, गोटाबया राजपक्ष यांनी अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला.

श्रीलंकेतील आर्थिक स्थिती नाजूक होत आहे. दुसरीकडे चीनविरोधात नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. त्याचवेळी राजीनाम्यासाठी राजपक्ष यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. राजपक्ष सरकार अडचणीत आले असून नवीन मंत्री नेमूनही ते राजीनामे देत आहेत. नागरिकांत नैराश्‍य वाढत चालले आहे. शेवटी नागरिकांचा वाढता दबाव पाहता गोटाबया यांनी काल आणीबाणी मागे घेतली. या आणीबाणीमुळे सुरक्षा दलाला अमर्यादित अधिकार मिळाले होते. मात्र श्रीलंकन सरकारने या आणीबाणीचे समर्थन केले आहे. श्रीलंकेच्या सरकारने काढलेल्या निवेदनात राजपक्ष हे राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. संसदेचे प्रतोद जॉनस्टन फर्नाडो यांनी म्हटले की, सरकार देशातील स्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नाही. देशात हिंसाचार निर्माण होण्यामागे विरोधी पक्ष जनाथा विमुखी पेरामुना (जेव्हीपी) पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

ठळक घडामोडी

  • श्रीलंकेतील नाॅर्वे, इराक आणि ऑस्ट्रेलियातील दूतावास तात्पुरते बंद

  • माजी अर्थ अधिकारी नंदलाल वीरसिंघे ७ एप्रिलपासून सेंट्रल बँकेचे गर्व्हनरपद सांभाळणार

  • श्रीलंकेत ८ एप्रिलपर्यंत साडे सहा तासांचे वीजेचे भारनियमन

माझ्या देशाची आणि नागरिकांची स्थिती पाहून मला एक श्रीलंकन नागरिक म्हणून अतिशय दु:ख होत आहे. सध्या श्रीलंकेबाबत जे काही जगभरात दाखवले जात आहे, त्या आधारावर घाईघाईने निष्कर्ष काढू नये. यानुसार कोणत्याही गटाला बदनाम करू नये.

- जॅकलिन फर्नांडिस, अभिनेत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com