येथे दोन बायका करणाऱ्यांना मिळणार बक्षीस......

शुक्रवार, 2 मार्च 2018

संयुक्त अरब अमीरात: अनेक देशांमध्ये दोन लग्न करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. पण जगामधे अनेक असे देश आहेत कि जे आपल्या देशातील तरुणांना दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर दुसरे लग्न करणाऱ्या तरुणांना वेगवेगळे भत्तेदेखील देतात. त्यातील एक देश म्हणजे संयुक्त अरब अमीरात (UAE). खलीज टाइम्सनुसार सयुंक्त अरब अमीरातमध्ये अविवाहित तरुणींची संख्या वाढत आहे यावरून तेथील राज्यकर्ते चिंतेत आहेत. 

या देशाचे पायाभूत विकास मंत्री डॉ. अब्दुल्ला बेलहैफ अल नुईमी यांनी तरुणांना दुसऱ्या लग्नाला प्रोत्साहित करण्यासाठी एक स्कीम आणली आहे. तशी घोषणा फेडरल नॅशनल कॉन्सिलमाच्या बैठकीमध्ये केली. 

घोषणा करताना ते म्हणले कि दोन पत्नी असणाऱ्या सर्व लोकांना शेख झायद हाउसिंग कार्यक्रमा कार्यक्रमांतर्गत घरभाडे भत्ता दिला जाईल. हा भत्ता दुसऱ्या पत्नीच्या घर भाड्यासाठी असेल. म्हणजेच एक पत्नी असणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या घर भाडे भत्तापेक्षा अतिरिक्त असेल. पुढे ते असं म्हणतात कि दुसऱ्या पत्नीची जगण्याची व्यवस्था हि पहिल्या पत्नीप्रमाणेच असावी. घरभाडे भत्ता मिळाल्यामुळे लोक दुसऱ्या लग्नासाठी प्रोत्साहित होतील. त्यामुळे अविवाहित तरुणींची संख्या घटण्यास मदत होईल.  

संयुक्त अरब अमीरातमध्ये तरुणींची संख्या वाढत आहे, यावर फेडरल नॅशनल कॉन्सिलचे सदस्य चिंतेत आहेत. त्यातील काही सदस्यांच्यामते लोक दसुरे लग्न न करून देशावरील आर्थिक बोजा वाढवत आहे. येणाऱ्या काळात या स्कीमला कसा प्रतिसाद भेटतो हे पहाणे मनोरंजक असणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emirati men with two wives will get housing allowance