ऑफिसमधून फोन आल्यावर म्हणाला कोरोना झालाय...

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 मार्च 2020

ऑफिसमधून फोन आल्यानंतर कर्मचारी म्हणाला मला कोरोना झाला आहे. यामुळे तीन दिवस ऑफिसला सुट्टी देण्यात आली. चौकशी झाल्यानंतर त्याला कोरोना न झाल्याचे समजल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले शिवाय 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

बीजिंग (चीन) : ऑफिसमधून फोन आल्यानंतर कर्मचारी म्हणाला मला कोरोना झाला आहे. यामुळे तीन दिवस ऑफिसला सुट्टी देण्यात आली. चौकशी झाल्यानंतर त्याला कोरोना न झाल्याचे समजल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले शिवाय 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शिवाय, जगभरातही कोरोनाची लागन झाली आहे. जगभरात आतापर्यंत 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, झू नावाचा कर्मचारी ऑफिसला येत नव्हता. यामुळे ऑफिसमधून त्याला फोन करण्यात आला. यावेळी त्याने मला कोरोना व्हायरची लागण झाल्याचे सांगितले. त्याच्या उत्तरानंतर ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली. कंपनीने त्याला तत्काळ सुट्टी दिली. शिवाय, त्याच्या शेजारी बसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनाही सुट्टी जाहिर केली. परंतु, या तरुणाची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर तो निगेटिव्ह असल्याची माहिती पुढे आली. यामुळे त्याच्या कुटुंबीयाचा जीव भांड्यात पडला. परंतु, कंपनीने त्याचा वैद्यकीय अहवाल मागितला असता त्याने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान त्याने आपण सुपर मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा मला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली दहावर  

पोलिसांना तपासादरम्यान झू हा खोटं बोलत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीने झूला नोकरीवरून काढून टाकले. शिवाय, त्याला 3 महिन्याची शिक्षा सुनावली. त्याने माफी मागितल्यानंतर कंपनीने त्याला पुन्हा कामावर घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An employee fakes being a corona patient in china