भारत सरकारशी अद्याप चर्चा सुरु; DCGI च्या नोटीशीनंतर फायझरचं स्पष्टीकरण

pfizer vaccine
pfizer vaccineSakal

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. देशात सध्या प्रामुख्याने कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. या लसींसह देशात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात देखील करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली. त्यानंतर 60 वय वर्षांपुढील आणि 45 वर्षांपुढील सहव्याधी नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आले. या वयोगटातील लोकांचे लसीकरण पूर्ण झाले नसतानाच तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. यामुळे देशात सध्या लशींचा तुटवडा असून राज्यांकडून लशींचा अधिकचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे. अशात केंद्र सरकारकडून फायझर आणि मॉडर्ना लसीसाठी प्रयत्न सुरु आहेत. (Engaged with Indian government for COVID 19 vaccine supply says Pfizer)

pfizer vaccine
अनाथ मुलांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून 'या' आहेत कल्याणकारी योजना
pfizer
pfizer

ज्या कोरोना प्रतिबंधक लशींच्या आपात्कालीन वापराला अमेरिकेच्या औषध आणि अन्न प्रशासनाने आणि इतर देशांनी किंवा जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे. अशा लशींच्या आपत्कालीन वापराला भारताला मंजुरी देण्यात आली आहे. देशातील लशींचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. डीसीजीआयचे प्रमुख व्ही. जी. सोमानी यांनी यासंदर्भात नोटिस जारी केली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं होतं.

मात्र, याबाबत आता फायझरने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. फायझरच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, फायझरची लस भारतातील लसीकरणाच्या मोहिमेत समाविष्ट करण्यासंदर्भातील निर्णयाबाबत फायझर कंपनी अजूनही केंद्र सरकारसोबत चर्चा करत आहे. याबाबतच्या चर्चा सध्या सुरु असल्याने याबाबतची अधिक माहिती आता यावेळेला देता येणार नाही, असं स्पष्टीकरण फायझर कंपनीचे प्रवक्त्यांनी दिलं आहे.

pfizer vaccine
महाराष्ट्राची 'लेडी सिंघम' मेहुल चोक्सीला आणणार भारतात!
Pfizer-Company
Pfizer-Company

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अनेक लशींच्या भारतातील वापराला मंजुरी मिळणार असल्याचं चित्र आहे. फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या भारतातील वापराचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे, मात्र, अद्याप यावरचं शंकेचं सावट दूर झालं नाहीये.

अमेरिकेची एफडीआयने किंवा जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापराला मंजुरी दिलेल्या लशी आता भारतात वापरता येतील. भारतात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार प्रयत्न करताना दिसत आहे.

दरम्यान, भारतात सध्या तीन लशींच्या वापराला मंजुरी आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक V लशींचा समावेश आहे. सध्या सीरम इन्स्टिट्यूट महिन्याला 5 ते 6 कोटी लशींचे उत्पादन करते, तर भारत बायोटेकने मे महिन्यात 1.3 कोटी लशींचे उत्पादन केले आहे. रशियाच्या स्पुटनिल लशींचे उत्पादन भारतात नुकतेच सुरु करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत देशात मुबलक प्रमाणत लस असतील असं सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com