चक्क माणूस गाढवावर करु लागला मुलासारखं 'प्रेम'; बाटलीतून पाजतो दूध अन्..

England Man Adopts Baby Donkey
England Man Adopts Baby Donkeyesakal
Summary

मुक्या प्राण्यांना मारु नये, असं आपण अगदी लहानपणापासून शिकत आलोय.

माणुसकी (Humanity) आणि भुतदयेची शिकवण अनेक साधुसंतांनी दिलीय. मुक्या प्राण्यांना (Animals) मारु नये, असं आपण अगदी लहानपणापासून शिकत आलो आहे. आपण स्वतःच्या घरी असलेल्या कुत्रा (Dog), मांजर (Cat) अशा पाळीव प्राण्यांवर (Pet Animal) प्रेम (Love) करतो. मात्र, तेच प्राणी इतरत्र दिसले तर त्यांना दगड, काठ्या मारतो. इतर प्राण्यांच्याबाबतही लोकांचं वर्तन असंच असतं. परंतु, जगात असे अनेक लोक आहेत, जे जगातील प्रत्येक लहान-मोठ्या प्राण्याचं अस्तित्व मान्य करतात आणि त्यांना शक्य तितकी मदतही करतात.

माणूस आणि प्राणी एकमेकांची भाषा बोलू शकत नाहीत; पण प्रेमाची भाषा दोघांनाही समजते. एकीकडं प्राणी माणसावर मनापासून प्रेम करतात, तर दुसरीकडं काही वेळा माणसांच्या प्रेमात धूर्तपणा आपल्याला पहायला मिळतो. परंतु, असे काही लोक आहेत, त्यांना प्राणीमात्रांवर प्रामाणिकपणे प्रेम करायला आवडतं आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून काही अपेक्षाही नसते. अलीकडेच इंग्लंडमधील (England) एक व्यक्ती 'या' कारणामुळं चर्चेत आहे. त्यानं एका गाढवाला (England Man Adopts Baby Donkey) आपलं मूल म्हणून दत्तक घेतलंय आणि त्याची तो खूप काळजी घेतो.

England Man Adopts Baby Donkey
Viral Video | माणूस बनला देवदूत, माकडाचे वाचवले प्राण

जेव्हा गाढवाची आई त्याला सोडून गेली, तेव्हा जॉननं ठरवलं की, तो त्याला विकणार नाही आणि तेव्हापासून जॉननं गाढवाला (Donkey) आपल्या मुलाप्रमाणं वाढवायला सुरुवात केली. त्याला आपल्या घरात देखील आणलं. जेव्हा हे गाढव त्याला रस्त्यात सापडलं, तेव्हा ते खूपच अशक्त होतं. त्यामुळं जॉननं गाढवाला दूध (Baby Donkey Drink Milk from Bottle) पाजलं. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका श्वान तज्ञ महिलेनं त्याला या कठीण काळात खूप मदत केलीय. गाढवाची घरात राहण्याची सोय देखील केली. त्याला (Baby Donkey Wear Diaper) ही घालण्यास सुरुवात केलीय, जेणेकरून घर घाण होणार नाही, याची तो काळजी घेतोय. बीबीसीशी (BBC) बोलताना जॉननं सांगितलं, की आता मूल (गाढव) निरोगी आहे. तो दिवसभर कुत्र्यांशी खेळतो आणि माझ्या मागे-मागे फिरतो, जणू तो कुत्रा आहे, गाढव नाही, असंच वाटतं, असं तो म्हणाला. त्या गाढवालाही आता जॉनचा लळा लागलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com