भरमैदानात खेळाडूने प्रतिस्पर्ध्याशी केलं अश्लील वर्तन; धक्कादायक VIDEO आला समोर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

इंग्लिश फूटबॉलपटू डार्नेल फिशर वादात अडकला आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचा प्रायव्हेट पार्ट दाबल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रिस्टन (इंग्लंड) - इंग्लिश फूटबॉलपटू डार्नेल फिशर वादात अडकला आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचा प्रायव्हेट पार्ट दाबल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. Sheffield Wednesday विरुद्ध झालेल्या चॅम्पियनशिपच्या सामन्यावेळी हा प्रकार घडला आहे. 

याप्रकरणी फूटबॉल असोशिएन चौकशी करत असून एकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये फिशर कॉलम पॅटरसनचा प्रायव्हेट पार्ट दोनवेळा दाबल्याचं दिसत आहे. चॅम्पियनशिपच्या सामन्यात शेफिल्डने 1-0 ने विजय मिळवला.

सामन्याच्या सेकंड हाफमध्ये हा प्रकार घडला. फिशर यामध्ये दोन वेळा पॅटरसनच्या प्रायव्हेट पार्टला हात लावत असल्याचं दिसत आहे. शेफिल्डला समजेपर्यंत पॅटरसनने दुसऱ्या लगेच हा प्रकार केला. 

पॅटरसनने केलेल्या या गैरवर्तानाप्रकरणी प्रशासकीय समिती शिक्षा काय सुनावायची याचा निर्णय़ घेणार आहे. त्याआधी रेफ्री डेव्हीड वेब यांचा रिपोर्ट मागवण्यात येईल. दमर्यान, शेफिल्डचा मॅने्जर टॉनी पुलिसने म्हटलं की, मी काही पाहिलं नाही पण मला वाटतं की सोशल मीडियावर हीच चर्चा आहे. जर हे खरं असेल तर शेफिल्ड निशाण्यावर येईल हे नक्की. 

हे वाचा - अमेरिकेतील मॉलमधील गोळीबार प्रकरणात 15 वर्षांच्या मुलाला अटक

याआधी इंग्लंडच्या रग्बी युनियन इंटरनॅशनने जो मार्लरने असा प्रकार केला होता. या प्रकरणी त्याच्यावर दहा आठवड्याची बंदीही घालण्यात आली होती. तसंच ऑगस्टमध्ये झालेल्या सुपर लीगमध्ये एका खेळाडूवर पाच सामन्यांची बंदी घातली गेली होती. तसंच गेल्याच आठवड्यात कॅटलान्स ड्रॅगन्सचा जोएल टॉमकिन्स याच्यावर आठ सामन्यांसाठी बंदीची कारवाई करण्या तआली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: english footballer grabb opponent private part twice during match