रशिया-युक्रेन युद्धात पर्यावरणाचाही बळी

स्थिती सुधारण्यासाठी अनेक वर्ष लागणार; पक्ष्यांचा अधिवास सैनिकांच्या टाचेखाली
Environmental loss in the Russia-Ukraine war new york
Environmental loss in the Russia-Ukraine war new yorksakal

न्यूयॉर्क : युद्धामुळे आता युक्रेन आणि परिसरातील पर्यावरणाच्या हानीबाबत चर्चा होत आहे. युक्रेनमधील युद्धामुळे मनुष्यहानीबरोबरच हवा, पाणी आणि माती प्रदूषित होत आहे. रशियाकडून अजूनही हल्ले केले जात असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून ते स्वच्छ होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. कर्करोग आणि श्‍वसनविकाराचा धोका बळाविण्याची शक्यता निर्माण झाली असून मुलांच्या सर्वांगिण विकासावरही त्याचे नकारात्मक परिणाम होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून नागरिक रणगाडे तसेच अवजड वाहनांच्या संपर्कात आहेत. स्फोट, आग, इमारत कोसळणे, विषारी वायुचा प्रसार यामुळे नागरिकांच्या आरोग्यांवर परिणाम होत आहेत. ही बाब केवळ युक्रेनपुरतीच मर्यादित राहणार नाही तर लगतच्या देशातील नागरिकांचे आरोग्य देखील संकटात सापडू शकते. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे समन्वयक स्टिफन स्मिथ म्हणाले की, सध्या आपण मोठ्या पर्यावरणीय समस्येला सामोरे जात आहोत. युक्रेन सरकारसाठी काम करणारे सुमारे १०० हून अधिक निरीक्षक हे संवेदनशील भागातील माती आणि पाण्याचे नमुने गोळा करत आहेत. युक्रेनचे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्रोतांचे उपमंत्री इरिना स्टावचुक म्हणाल्या की, युद्धामुळे पर्यावरणाच्या हानीचे आकलन करणे कठिण आहे. कारण निरीक्षक अनेक भागात अद्याप पोचलेलेच नाहीत. विविध स्वयंसेवी संस्थांकडून प्रदूषित ठिकाण निश्‍चित करण्यात येत आहेत. यात पॅक्स नावाची हॉलंडची स्वयंसेवी संस्था सक्रिय आहे. यापूर्वी या संस्थेने सीरिया आणि अन्य युद्धग्रस्त भागातील प्रदूषणाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पॅक्स’ संस्थेचे ज्विजनबर्ग यांनी म्हटले, की युद्धाच्या काळात पर्यावरणाच्या हानीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. परंतु याकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. पर्यावरण केवळ झाड वाचवणे किंवा वृक्षारोपणापुरतीच मर्यादित नाही तर ही लोकांची प्राथमिकता आहे. कारण वातावरण प्रदूषित झाले तर कोणीही राहू शकत नाही.

वणवा पेटण्याची शक्यता

रशियाकडून युक्रेनमध्ये हल्ले आणखी काही दिवस सुरू राहिले तर दुष्काळग्रस्त युक्रेनच्या जंगलात आगीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वर्षातील सर्वात उष्ण महिन्यांत जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी आता मर्यादित स्रोत राहिले आहेत. त्यामुळे रशियाचे हल्ले थांबले तरच जंगलाचे आणि वनसंपदाचे होणारे संभाव्य नुकसान कमी राहू शकते. कोळशाच्या खाणीवर तसेच औद्योगिक वसाहत, औष्णिक केंद्र, अणु केंद्र यावर हल्ले केल्याने त्याचे दुष्परिणाम माती आणि पाण्यावर होत आहेत

काळ्या समुद्रावरील जीव संवर्धन प्रदेश संकटात : युक्रेनच्या दक्षिणकडील किनारपट्टीच्या काळा समुद्रावरील जीव संवर्धन प्रदेश हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी स्वर्ग मानला जातो. या ठिकाणी १ लाख २० हजाराहून अधिक पक्षी हिवाळ्यात या किनाऱ्यावर येतात. या ठिकाणी दुर्मीळ प्रजातीचे पक्षी पाहवयास मिळतात. या संरक्षित भागात त्यांचा अधिवास असतो. पांढऱ्या शेपटीचा गरुड, स्टिल्ट बर्ड अशांचा वावर असतो. डॉल्फिन, दुर्मीळ फुळं, माशांच्या डझनभर प्रजाती या ठिकाणी आहेत. परंतु आता हा प्रदेश रशियन सैनिकांनी व्यापलेला आहे. युक्रेनचे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्रोत उपमंमत्री ॲलेक्झांडर क्रॅस्नोलुत्स्की यांनी म्हटले की, या ठिकाणी झालेल्या पर्यावरण हानीची कोणतिही माहिती आपल्याकडे नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com