सिंगापूरला क्वारंटाइनसाठी इ-टॅग

यूएनआय
Tuesday, 4 August 2020

इतर काही देशांतून येणाऱ्या काही प्रवाशांच्या क्वारंटाइनवर देखरेख ठेवण्यासाठी सिंगापूरमध्ये इलेक्ट्रॉनिक टॅगची (इ-टॅग) पद्धत सुरु करण्यात येईल. या देशांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.

हे उपकरण 11 ऑगस्टपासून तेथून येणाऱ्यांना दिले जाईल. सरकारी केंद्राऐवजी घरीच त्यांचे विलगीकरण केले जाईल. जीपीएस आणि ब्लूटूथ सिग्नलवर चालणाऱ्या उपकरणासाठी संदेश पाठविण्यात येतील.

सिंगापूर - इतर काही देशांतून येणाऱ्या काही प्रवाशांच्या क्वारंटाइनवर देखरेख ठेवण्यासाठी सिंगापूरमध्ये इलेक्ट्रॉनिक टॅगची (इ-टॅग) पद्धत सुरु करण्यात येईल. या देशांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे उपकरण 11 ऑगस्टपासून तेथून येणाऱ्यांना दिले जाईल. सरकारी केंद्राऐवजी घरीच त्यांचे विलगीकरण केले जाईल. जीपीएस आणि ब्लूटूथ सिग्नलवर चालणाऱ्या उपकरणासाठी संदेश पाठविण्यात येतील. त्यास प्रतिसाद देणे अनिवार्य असेल. घरातून बाहेर पडल्यास किंवा उपकरणात फेरफार केल्यास सरकारी संस्थेला धोक्याचा इशारा मिळेल.

इस्त्राईलने स्वत:भोवती तयार केलंय अदृष्य कवच; शत्रू राष्ट्राला हल्ला करणं सोपं नाही

ही पद्धत हाँगकाँग आणि दक्षिण कोरियात वापरली जात आहे. हाँगकाँगमध्ये मनगटाला इलेक्ट्रॉनिक पट्टी बांधली जाते. दक्षिण कोरियात हे उपकरण स्मार्टफोनला जोडले जाते.

हे उपकरण कसे असेल हे अद्याप जाहीर झाले नसले तरी आवाज किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा नसेल तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती साठविण्याची सोय नसेल असे स्पष्ट करण्यात आले. 12 वर्षांखालील व्यक्तींसाठी ते देण्यात येणार नाही.

कोविड 19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली भीती

...तर कारावास किंवा दंड
संसर्गजन्य विकार कायद्यानुसार निर्बंधांचा भंग केल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दहा हजार सिंगापूर डॉलर (7272 अमेरिकी डॉलर, पाच लाख 47 हजार 337 रुपये 99 पैसे) दंड अशी तरतूद आहे. याच नियमानुसार परदेशी नागरिकांचा कामाचा परवानाही रद्द केला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Etag for quarantine to Singapore