इस्त्राईलने स्वत:भोवती तयार केलंय अदृष्य कवच; शत्रू राष्ट्राला हल्ला करणं सोपं नाही

कार्तिक पुजारी
Monday, 3 August 2020

इस्त्राईल हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप छोटा देश आहे. मात्र, देशाने स्वत:ला इतके शक्तीशाली बनवलं आहे की, कोणताही देश त्यांच्यावर हल्ला करण्याआधी दहावेळा विचार करेल.

तेल अवीव- इस्त्राईल हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप छोटा देश आहे. मात्र, देशाने स्वत:ला इतके शक्तीशाली बनवलं आहे की, कोणताही देश त्यांच्यावर हल्ला करण्याआधी दहावेळा विचार करेल. इस्त्राईल या देशाची स्थापना 1948 साली झाली. तेव्हापासून या देशाला अरब राष्ट्रांसोबत संघर्ष करावा लागला आहे. 1967 साली इस्त्राईलने इराक, जॉर्डन आणि सिरिया या देशांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे इस्त्राईलने अवघ्या 6 दिवसात या राष्ट्रांना पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे इस्त्राईलची ताकद सर्व जगाला कळाली होती. इस्त्राईलकडून वारंवार मिळालेल्या पराभवामुळे अरब राष्ट्रांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे हे देश इस्त्राईलवर हल्ला करण्याचा कट आखत असतात. शत्रू राष्ट्रांपासून कोणत्याही हल्ल्यापासून वाचण्यासाठी इस्त्राईलने आपल्या भोवती अदृष्य असं सुरक्षा कवच बनवलं आहे. 

कोविड 19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली भीती

इस्त्राईलला अँटी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचं अदृष्य कवच आहे. त्यामुळे कोणताही देश इस्त्राईलवर क्षेपणास्त्र हल्ला करु शकत नाही. शिवाय कोण्या देशाने तसा प्रयत्न करु पाहिला तरी इस्त्राईली क्षेपणास्त्रे त्याला हवेतच नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. याशिवाय इस्त्राईलने गाझा पट्टी सीमेलगत सर्व बाजूंनी मोठमोठ्या भिंतींची उभारणी केली आहे. गाझा पट्टी हा खदखदणारा भाग आहे. गाझा पट्टीतील दहशतवादी इस्त्राईलवर नेहमी हल्ला करण्याच्या प्रयत्न करत असतात. त्यामुळे इस्त्राईलने या भागात भिंती उभारल्या आहेत. शिवाय इस्त्राईलने अनेक सीमा भागात रोबो सैनिक तैनात केले आहेत. शत्रूंची हालचाल दिसतात हे रोबो त्या दिशेने गोळीबार सुरु करतात. 

देशात ठिकठिकाणी बंकर तयार करण्यात आले आहेत. घर, ऑफिस, मॉल, उद्याने अशा सर्व ठिकाणी बंकर आहेत. त्यामुळे शत्रू राष्ट्रांकडून हल्ला झालाच तर सर्व लोक या बंकरमध्ये सुरक्षित राहू शकतात. इस्त्राईलमध्ये एक हॉटेल आहे, जे किल्ल्यापेक्षाही अधिक मजबूत आहे. यावर बॉम्ब हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. अमेरिकेचे राष्ट्रपतीही या हॉटेलमध्येच थांबतात. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्त्राईल भेटीवेळी या हॉटेलमध्ये थांबले होते. 

अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर

इस्त्राईल तंत्रज्ञानाच्या बाबतीतही पुढारलेला देश आहे. इस्त्राईल मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान निर्यात करत आला आहे. लष्करी उपकरणाच्या बाबतीत इस्त्राईलने अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बनवली आहे. देश मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्यात करत असतो. भारतही इस्त्राईलकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करतो. इस्त्राईलची जमीन ही कोरडवाहू आहे. येथे अल्प प्रमाणात पाऊस पडतो. असे असले तरी इस्त्राईलने सूक्ष्म नियोजनाने आपल्या देशाची प्रगती केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There can be no missile attack on Israel