esakal | कोरोना लसीमुळे रक्तात गुठळ्या; जगभरात भीती आणि गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

astrazenca vaccine europe

डेन्मार्कनंतर थायलंडने अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लसीचे डोस देण्याची मोहीम पुढे ढकलली आहे. ही लस टोचल्यानंतर युरोपमधील काही जणांच्या रक्तात गुठळ्या होत असल्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना लसीमुळे रक्तात गुठळ्या; जगभरात भीती आणि गोंधळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जिनिव्हा - युरोपातील अनेक देशांनी एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीचा वापर थांबवला आहे. यावरून आता जागतिक आरोग्य संघटनेनं एस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर थांबवण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे. युरोपात काही देशांमध्ये एस्ट्राझेनकाच्या लसीचे दुष्परिणाम होत असल्याचं समोर आलं होतं. लस घेतलेल्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्यानं युरोपिय देशांमध्ये एस्ट्राझेनकाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा वापर कमी केला. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितलं की, एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनचा वापर सुरु ठेवायला हवा. एस्ट्राझेनका ही इतर लसींसारखीच चांगली आहे ज्यांचा सध्या जगभरात वापर केला जात आहे. आम्ही मृत्यूच्या डेटाचं विश्लेषण करत आअसून अद्याप कोणाचाही व्हॅक्सिनमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही. 

डेन्मार्कनंतर थायलंडने अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लसीचे डोस देण्याची मोहीम पुढे ढकलली आहे. ही लस टोचल्यानंतर युरोपमधील काही जणांच्या रक्तात गुठळ्या होत असल्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. वास्तविक या डोसशी याचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

हे वाचा - कॅनडामध्ये लावण्यात आलेले मोदींचे होर्डिंग एका दिवसात हटवले; जाणून घ्या कारण

थायलंडचे सार्वजनिक आरोग्य मंत्री अनुतीन चार्नविराकुल यांनी सांगितले की, आमच्या देशाला विषाणू संसर्गाचा फार मोठा फटका बसलेला नाही. दरम्यानच्या कालावधीत आम्ही इतर लसींवर अवलंबून राहू शकतो. पंतप्रधान प्रयूत चान-ओ-चा हे स्वतः शुक्रवारी लस टोचून घेऊन मोहिमेला प्रारंभ करणार होते. डेन्मार्क आणि नॉर्वेसह काही देशांनी या लसीचा वापर थांबविल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. युरोपमध्ये आतापर्यंत सुमारे ५० लाख लोकांनी अॅस्ट्राझेनेकाची लस टोचून घेतली आहे.

अॅस्ट्राझेनेकाची लस टोचल्यानंतर रक्तात गुठळ्या निर्माण होण्याच्या युरोपमध्ये सुमारे ३० घटना घडल्या आहेत. या लसीचा वापर स्थगित केलेल्या देशांत शुक्रवारी बल्गेरियाची भर पडली. लसीच्या सुरक्षिततेबाबत युरोपीय औषध संस्थेने लेखी निवेदन करावे अशी बल्गेरियाकडून मागणी करण्यात आली आहे. 

हे वाचा - भारतानंतर सौदी अरेबियानेही चीनला दिला झटका, १८४ वेबसाइट केल्या बंद

युरोपीय औषध संस्थेकडून यापूर्वीच ग्वाही देण्यात आली आहे.  लसीमुळे रक्तात गुठळ्या निर्माण होत असल्याचे अद्याप सूचित झालेले नाही असा खुलासाही करण्यात आला आहे. तसंच लस घेण्याचे फायदे धोक्यांपेक्षा जास्त असल्याचंही सांगण्यात आलं आहे. प्रयोगशाळेत विस्तृत प्रमाणावर झालेल्या चाचण्यांमधून लसीच्या सुरक्षिततेचा अभ्यास झाल्याचे अॅस्ट्राझेनेका कंपनीकडून निवदेन देण्यात आलं आहे. पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको आणि फिलीपीन्स या देशांमधील अॅस्ट्राझेनेका लस देण्याची मोहीम सुरु आहे.

loading image
go to top