esakal | भारतानंतर सौदी अरेबियानेही चीनला दिला झटका, १८४ वेबसाइट केल्या बंद
sakal

बोलून बातमी शोधा

भारतानंतर सौदी अरेबियानेही चीनला दिला झटका, १८४ वेबसाइट केल्या बंद

खराब, भेसळयुक्त सामान विकणं आणि फसवी ऑफर देण्याचा ठपका ठेवत सौदी अरेबियानं चीनच्या वेबसाइटवर बंदी घातली.

भारतानंतर सौदी अरेबियानेही चीनला दिला झटका, १८४ वेबसाइट केल्या बंद

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भारतानंतर आता सौदी अरेबियानंही चीनची कोंडी केली आहे. सौदी अरेबियानं तब्बल १८४ चिनी वेबसाइट (संकेतस्थळ) बंद केल्या आहेत. खराब, भेसळयुक्त सामान विकणं आणि फसवी ऑफर देण्याचा ठपका ठेवत सौदी अरेबियानं चीनच्या १८४ वेबसाइटवर बंदी घातली आहे. गोल्‍फ न्‍यूजच्या रिपोर्ट्सनुसार, चीनच्या या वेबसाइट सौदी अरेबियाच्या बाजारपेठांवर कब्जा करत आहेत. त्यामुळे सौदी अरेबियानं हा निर्णय घेतला. अल-जजीरा वर्तमानपत्रानं आपल्या रिपोर्ट्समध्ये असं म्हटले की, या सर्व चिनी वेबसाइट ग्राहकांना रिटर्न, एक्सचेंज आणि इतर सुविधांची सेवा देण्यात अशस्वी ठरत होत्या. इतकेच नाही तर ग्राहकांची दिशाभूल करत होत्या. त्यामुळेच सौदी अरेबियाच्या मंत्रालयानं या सर्व वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. याआधी भारताने ६० पेक्षा जास्त अॅप्सवर बंदी घालत चीनला मोठा धक्का दिला होता. या धक्क्यातून चीन सावरत नाही तोपर्यंत सौदी अरेबियानेही धक्का देत आर्थिक कोंडी केली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, या सर्व चिनी वेबसाइटच्या उत्पादनावर ग्राहकसेवा क्रमांकासह इतर महत्वाच्या बाबींची नोंद नाही.  सौदी अरेबिया सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून  सर्वसामान्य व्यक्तींना वस्तू घेताना योग्य ती काळजी घेण्याचं तसेच विश्वसनीय दुकानातूनच सामानाची खरेदी करा, असं आव्हान केलं आहे. 
 
एएनआयच्या रिपोर्ट्सनुसार, ग्राहक उत्पादनावर असलेल्या अरबी भाषेच्य जाहीरातीमुळे आकर्षीत होत आहेत. तसेच या जाहीराती त्यांच्या आयुष्यासी निगडीत आहेत, असा निष्कर्ष सौदी अरेबियातील आधिकाऱ्यांनी काढला आहे. 
 

loading image
go to top