Europe Gen Z Protests
esakal
युरोपातील अनेक देशांमध्ये तरुणांचे आंदोलन सुरू असताना आता जर्मनीतही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात आंदोलकांनी दुकानांची तोडफोड आणि लूटमार केली. तसेच बर्लिन, कोलोन आणि हॅम्बर्गमध्येही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या घटनांमध्ये २७ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, शेकडो जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.