
European airports face disruptions after a massive cyber attack affecting several countries.
esakal
Cyber Attack on European Airports: Latest Update: युरोपमधील अनेक देशांच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स, ब्रिटिशांची राजधानी लंडनमधील हीथ्रो विमानतळ आणि जर्मनीची राजधानी बर्लिन यासारख्या प्रमुख युरोपीय विमानतळांवर शनिवारी अनेक विमाने यामुळे प्रभावित झाली आहेत. यापैकी बहुतांश विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. यावेळी सायबर हल्ल्याने चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टमला करणाऱ्या संचालित करणाऱ्या सेवा प्रदात्यास लक्ष्य केले आहे.
दरम्यान, ब्रुसेल्स विमानतळ व्यवस्थापनाने पुष्टी केली आहे की, शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे स्वयंलित यंत्रणा बंद झाली, ज्यामुळे केवळ मॅन्युअल चेकइन आणि बोर्डिंग शक्य होवू शकले.
याशिवाय विमानतळाकडून सांगण्यात आले की,१९ सप्टेंबर रोजी रात्री आमच्या सेवा प्रदात्यावर सायबर हल्ला झाला, जो चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टमसाठी जास्त जबाबदार आहे आणि हा हल्ला अनेक युरोपीय विमानतळांना प्रभाविकत करतो, ज्यात ब्रुसेल्स विमानतळाचाही समावेश आहे.
तसेच हीथ्रो विमानतळाने प्रवाशांना लांब पल्ल्याच्या विमानासाठी, म्हणजेच तीन तासांपेक्षा जास्त आणि देशांतर्गत विमानसेवेसाठी दोन तासांपेक्षा जास्त लवकर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. .
दरम्यान विमानतळांकडून हेही सांगण्यात आले की, ही समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, प्रवाशांना आवाहन आहे की, विमानतळावर पोहचण्याआधी आपल्या नियोजित विमानाची स्थिती एकदा तपासून घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.