Eye of Fire: समुद्राला लाग लागल्याचं विचित्र दृष्य; पाहा व्हिडिओ

Eye of Fire
Eye of Fire
Summary

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये पाण्याला आग लागल्याचं दुर्मिळ दृष्य पाहायला मिळतंय. समुद्राच्या पाण्याला आग लागली (Ocean On Fire) आहे आणि त्याला विझवण्याची प्रयत्न केला जात आहे.

नवी दिल्ली- सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये पाण्याला आग लागल्याचं विचित्र दृष्य पाहायला मिळतंय. समुद्राच्या पाण्याला आग लागली (Ocean On Fire) आहे आणि त्याला विझवण्याची प्रयत्न केला जात आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना विश्वास बसला नाही, पण हा व्हिडिओ खरा आहे. मॅक्सिकोच्या समुद्रात (Mexico Fire) आग लागल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा विचित्र व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. (Eye of fire major fire in waters in Mexico WATCH viral video here)

समुद्रात लागली आग

पाणी आणि आग कधीही एकत्र येत नसल्याचं आपल्याला माहिती आहे. पाण्याला आग लागने तसं तर दुर्मिळच. पण, मॅक्सिकोच्या (Gulf Of Mexico Fire) एका खाडीमध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसा. सोशल मीडिया साईट ट्विटरवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येऊ लागला. व्हिडिओमध्ये जे दिसत होतं ते विश्वास ठेवण्यास थोडं कठीण होतं. यामध्ये समुद्रातून आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसत आहेत.

Eye of Fire
गुजरातमधील बारावी पास मुलाने 40 देशातील 25 हजार लोकांना गंडवलं

गॅस लीक झाल्याने लागली आग

बुचकळ्यात टाकणारा हा व्हिडिओ मॅक्सिकोच्या युकाटनमधील आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. समुद्राच्या पृष्ठभागावर वितळणारा लाव्हा पाहायला मिळाला. दूर-दूर पसरलेल्या समुद्रामध्ये एक नारंगी रंगाचा मोठा गोल दिसत आहे. ज्यातून आगीच्या ज्वाळा येताना दिसत आहेत. समुद्राच्या आतील पाईपलाईनमध्ये गॅस लीक (Gas Leak) झाल्याने ही आग लागली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोट्यवधी लोकांनी पाहिला व्हिडिओ

सोशल मीडियावर ट्विटर साईटवर हा व्हिडिओ Manuel Lopez San Martin यांनी शेअर केला. या व्हिडिओला आतापर्यत जवळपास ६ कोटी लोकांनी पाहिलं आहे. केवळ १७ सेकंदामध्ये १६ हजारपेक्षा अधिक लोकांनी याला रिट्विटट केले होते. दरम्यान, काही तासांनी ही आग विझवण्यात यश आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com