जगभरातील फेसबुक काही वेळासाठी 'बंद'..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

न्यूयॉर्क  - जगभरातील नेटिझन्ससाठी 'आधुनिक चावडी' बनलेले फेसबुक आज (शुक्रवार) सायंकाळी काही वेळासाठी चक्क बंद पडले. फेसबुक ओपन होण्यात अडचण यायला लागल्यामुळे ट्विटरवर यासंदर्भातील जोरदार चर्चाही सुरू झाली. 

भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री दहाच्या सुमारास ब्राझील, अमेरिका, ब्रिटन, मध्य-पूर्व, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक बंद पडल्याचा अनुभव युझर्सना आला. त्यानंतर भारत, जर्मनी, फ्रान्स आणि हॉलंडमध्येही असाच अनुभव आला. काही वेळातच थायलंड, कॅनडा, फिलिपिन्स, पोलंड, दक्षिण कोरिया, नेदरलँड्समध्येही हे जाणवले. त्यामुळे ही समस्या केवळ काही देशांपुरतीच नसून सगळीकडेच फेसबुक बंद पडल्याचे स्पष्ट झाले.

अर्थात साधारण पंधरा मिनिटांमध्ये बहुतांश देशांमध्ये फेसबुक पूर्ववत झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Closed for a few seconds