फेसबुकने हटविली 32 पेजेस, अकाउंट्‌स 

पीटीआय
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यकालीन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फेसबुक या सोशल मीडिया साइटने संशयित व्यवहाराच्या कारणावरून 32 पाने आणि अकाउंट्‌स हटविली आहेत. 

वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यकालीन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फेसबुक या सोशल मीडिया साइटने संशयित व्यवहाराच्या कारणावरून 32 पाने आणि अकाउंट्‌स हटविली आहेत. 

फेसबुकवर अशा प्रकारच्या व्यवहाराची परवानगी नाही. कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेने दुसऱ्यांविषयी अन्य लोकांची दिशाभूल करण्यासाठी नेटवर्क बनवावे, अशी आमची इच्छा नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे. मार्क झुकेरबर्गने स्थापन केलेल्या फेसबुकवर 2016च्या अमेरिकी अध्यक्ष निवडणुकीदरम्यान खोटी माहिती प्रसारित करण्यासाठी आपल्या व्यासपीठाचा उपयोग केल्याचा आरोप आहे. यावर कंपनीला कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे ती वादात अडकली. सध्याच्या तपासात फेसबुकच्या तंत्रज्ञ पथकाने आठ फेसबुक पेज आणि 17 प्रोफाइल, त्याचबरोबर सात इंस्टाग्राम खाती हटविली आहेत. 

सुमारे 150 जाहिराती चालविल्या जात होत्या 
दिलेल्या माहितीनुसार, हटविण्यात आलेल्या पेजेसपैकी एका पेजला 2 लाख 90 हजारपेक्षा अधिक अकाउंट्‌स फॉलो करत आहेत. हे पेज मार्च 2017मध्ये तयार करण्यात आले आहे. नव्याने तयार केलेले संशयित पेज मे 2018मधील आहे. अझत्लान वॉरियर्स, ब्लॅक इलिव्हेशन, माईफुल बीईंग आणि रेसीस्टर्स या फेसबुक पेजेस्‌ना सर्वाधिक फॉलोअर आहेत. उर्वरित पेजेस्‌ना शून्य ते 10 फॉलोअर्स आहेत. ही सर्व पेजेस्‌ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जवळपास 11 हजार अमेरिकी डॉलरच्या सुमारे 150 जाहीराती चालवत आहेत आणि त्यांना अमेरिकी; तसेच कॅनडा डॉलरमध्ये पैसे मिळत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook deleted 32 pages, accounts