esakal | माध्यमांसाठी फेसबुकची तब्बल 10 कोटी डॉलरची मदत

बोलून बातमी शोधा

Mark Zukerberg

जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या आपल्या देशातील सरकारला मदत करत असताना सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकही मदतीसाठी पुढे आले आहे. कोरोना साथीच्या रोगा दरम्यान फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार आहे.

माध्यमांसाठी फेसबुकची तब्बल 10 कोटी डॉलरची मदत
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग जगभरात वाढत असताना फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी माध्यमांना या धोक्यातून सावरण्यासाठी तब्बल 10 कोटी अमेरिकन डॉलरची मदत जाहिर केली आहे. 

जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या आपल्या देशातील सरकारला मदत करत असताना सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकही मदतीसाठी पुढे आले आहे. कोरोना साथीच्या रोगा दरम्यान फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार आहे. या विषाणूबद्दलच्या बातम्या सर्व न्यूज चॅनेल, वृत्तपत्र प्रसारित करत आहेत. या सर्वांसाठी फेसबुकने एक इन्व्हेस्टमेंट फंड बनवला आहे. या माध्यमातून कंपनी 25 मिलियन म्हणजे 2.5 कोटी अमेरिकी डॉलर फेसबुक जर्नलिझम प्रोजेक्टच्या माध्यमातून स्थानिक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना दिले जाणार आहे. याचे उद्दीष्ट म्हणजे जागतिक महामारी दरम्यान न्यूज इंडस्ट्रीला मदत पोहोचवणे आहे. तसेच 75 मिलियन डॉलर म्हणजे 7.5 कोटी डॉलर इतर मार्केटिंगसाठी खर्च करणार आहे. फेसबुककडून पहिल्या टप्प्यातील मदत ही अमेरिका आणि कॅनडामधील 50 न्यूज चॅनेलला करण्यात आली आहे. तसेच पब्लिशर्सला मिळालेल्या मदतीतून ते कोरोना विषाणूच्या सर्व बातम्या प्रसारित करत आहेत. यामध्ये रिपोर्टरचा प्रवास खर्च, रिमोट कार्याची क्षमता आणि फ्री-लान्स रिपोर्टसची भरती या कामाचा समावेश आहे. 

झुकेरबर्गने फेसबुक पोस्ट लिहिली आहे, की कठीण काळात आम्ही ज्या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहोत त्यांना मदत करणार आहे आणि अशा देशातील न्यूज इंडस्ट्रीलाही आर्थिक मदत करणार आहे. स्थानिक माध्यमांना लक्ष्य ठेवून आम्ही ही गुंतवणूक करत आहोत.