फेसबुकच्या शेअरची घसरगुंडी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जुलै 2018

न्यूयॉर्क : खोट्या बातम्या आणि गोपनीयतेच्या मुद्यावर वादग्रस्त ठरलेल्या फेसबुकची आर्थिक कामगिरी खालावली आहे. वॉलस्ट्रीटवरील सर्वात मोठी कंपनी असलेल्या फेसबुकच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्याने कंपनीला तब्बल 120 अब्ज डॉलरची बाजार भांडवल गमवावे लागले आहे. 

फेसबुकने बुधवारी वार्षिक निकाल जाहीर केले. ज्यात फेसबुकला 2017 च्या तुलनेत 5.1 अब्ज डॉलरचा नफा झाला. महसुलातदेखील 42 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, 13.2 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, खर्चात झालेली वाढ चिंताजनक असून पुढील सहा महिने कठीण असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. फेसबुकच्या सक्रीय सदस्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.

ज्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्‍त केला आहे. या वृत्तानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार विक्रीचा सपाटा लावला आहे. बुधवारी (ता.25) फेसबुकचा शेअर 20 टक्‍क्‍यांहून अधिक कोसळला होता. गुरुवारी (ता.26) त्यातील पडझड कायम होती. तो 18 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह तो 176.72 अब्ज डॉलरवर व्यवहार करत आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook shares slump