esakal | फेसबुकचा मुलांवर विपरित परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

GLOBAL

फेसबुकचा मुलांवर विपरित परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा/(पीटीआय)

वॉशिंग्टन : ‘फेसबुक’ आणि या कंपनीच्या मालकीच्या इतर सोशल मीडियाचा लहान मुलांवर विपरित परिणाम होत असून अमेरिकेत यामुळे ध्रुवीकरण होत आहे, असा दावा ‘फेसबुक’च्याच एका माजी माहिती शास्त्रज्ञाने आज अमेरिकी काँग्रेससमोर केला. याबाबत फेसबुकला माहिती असूनही लोकांच्या सुरक्षेऐवजी आर्थिक नफ्याची त्यांना अधिक काळजी असल्याने बदल करण्यास विरोध होत असल्याचा आरोपही या तज्ज्ञाने केला आहे.

फ्रान्सेस हॉगन यांचा आज अमेरिकी सिनेटच्या ग्राहक संरक्षण समितीसमोर जबाब झाला. ‘फेसबुक’ची धोरणे न पटल्याने हॉगन या राजीनामा देत कंपनीतून बाहेर पडल्या. मात्र, गप्प न बसता त्यांनी फेसबुकवर आरोपांची तोफ डागली. नोकरी सोडण्यापूर्वी त्यांनी बालकांवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणारी अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती गोपनीयरित्या काढून घेतल्या. त्याआधारावर त्यांनी फेसबुकविरोधात तक्रारही नोंदविली. ‘फेसबुक’च्या माध्यमातून द्वेष, अफवा आणि राजकीय अराजकता पसरत असल्याचे या कंपनीनेच केलेल्या संशोधनातून दिसून येत असतानाही कंपनीने ही बाब लपवून ठेवली, असे हॉगन यांनी म्हटले आहे.

फेसबुकच्या सर्व चुकीच्या कृत्यांची जबाबदारी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्यावर आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. हॉगन यांनी ‘फेसबुक’वर निर्भीडपणे आरोप केले. तसेच ल्या ‘इन्स्टाग्राम’मुळे मुलांचे नुकसान होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले असले तरी ही माहिती दडवून ठेवली. द्वेष व अफवा पसरविण्याबाबतही फेसबुकने अप्रामाणिकपणा दाखविला. फेसबुक व इन्स्टाग्राम हे ग्राहकांसाठी सुरक्षित कसे करायचे, हे कंपनीला माहिती आहे. मात्र, त्यांना तोटा होण्याची भीती वाटते. या प्रकाराविरोधात सरकारने ठामपणे पाऊल उचलणे आवश्‍यक आहे,’’ असे हॉगन म्हणाल्या.

हेही वाचा: WHOची मोठी घोषणा; 'मलेरिया'वर जगातील पहिल्या लसीला मान्यता

हॉगन यांचे ‘फेसबुक’वरील आरोप

महत्त्वाची माहिती हेतूपुर्वक अमेरिका सरकार, इतर देश आणि ग्राहकांपासून लपवून ठेवली

बालकांची सुरक्षा, ‘एआय’ यंत्रणा यसंदर्भातील संशोधनाबाबत जनतेची वारंवार दिशाभूल केली

कोण आहेत फ्रान्सेस हॉगन?

फ्रान्सेस हॉगन (वय ३७) या माहिती तज्ज्ञ आहेत. त्या संगणक अभियंत्या असून हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए देखील केले आहे. ‘फेसबुक’मध्ये २०१९ मध्ये रुजू होण्यापूर्वी गुगल, पिंटरेस्ट आणि येल्प या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांबरोबर १५ वर्षे काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

loading image
go to top