WHOची मोठी घोषणा; 'मलेरिया'वर जगातील पहिल्या लसीला मान्यता

जगभरातील गरीब देशांना मोठा दिलासा, लाखोंचे वाचणार प्राण
घाना : केप कोस्ट येथे RTS,S या मलेरियावरील पहिल्या लसीचे डोस तयार करताना एक नर्स. (Maleria Vaccine)
घाना : केप कोस्ट येथे RTS,S या मलेरियावरील पहिल्या लसीचे डोस तयार करताना एक नर्स. (Maleria Vaccine)

जिनिव्हा : मच्छर चावल्यानं होणारा आजार ज्यामुळं जगभरात दरवर्षी चार लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात, अशी जीवघेण्या मलेरियावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येणं शक्य होणार आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHOनं या आजारावर जगातील पहिल्या लसीला बुधवारी मान्यता दिली. RTS,S/AS01 नामक ही लस लहान मुलांसाठी असणार आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस यांनी ही घोषणा केली. या लसीमुळं गरीब देशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या लसीच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ती सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या लसीचा आता अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. या लसीला मान्यता दिल्याची घोषणा करताना घेब्रेसेस म्हणाले, "हा आपल्या सर्वांसाठी हा क्षण मैलाचा दगड ठरला आहे. कारण या आजारवर अद्याप दुसरी कुठलीही लस उपलब्ध नाही. या आजाराने सन २०१९मध्ये सुमारे ४ लाख लोकांचा जीव घेतला आहे. सहारन अफ्रिकेत हा मृत्यूदर सर्वाधिक आहे. या आजारामुळं तरुण मुलांचा सर्वाधिक बळी जात आहे. २०१९ मध्येच पाच वर्षांखालील २,७९,००० बालकांचा मृत्यू झाला आहे."

घाना : केप कोस्ट येथे RTS,S या मलेरियावरील पहिल्या लसीचे डोस तयार करताना एक नर्स. (Maleria Vaccine)
लखीमपूर हत्याकांडाची सुप्रीम कोर्टानं स्वतःहून घेतली दखल; उद्या सुनावणी

काही जणांना माहिती असेल की मी माझं करियर हे मलेरियावरील संशोधक म्हणून सुरु केलं होतं. त्यानंतर बऱ्याच मोठ्या काळानंतर आपण एका प्राचीन आणि भयानक आजारावर प्रभावी लस शोधून काढली आहे, असं घेब्रेसेस यांनी जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळं माझ्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे.

लसीचा डोस कसा असेल?

RTS,S या नावानं ही लस ओळखली जाणार असून GSK फार्मा कंपनीनं ती विकसित केली आहे. चार डोसमध्ये ही लस देण्यात येणार आहे. कमी संसाधनांमध्ये चार-डोस वितरित करण्याच्या जटिलतेमुळे लस प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरू शकते याबद्दल चिंता वाढली होती. या कारणास्तव, WHOच्या लस सल्लागारांनी यापूर्वी लस वापरण्याची शिफारस प्रायोगिक तत्वावर केली होती. हा कार्यक्रम 2019 मध्ये सुरू झाला, घाना, केनिया आणि मलावीने या लसीचा वापर सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com