चीनमध्ये बनावट लसीचा गैरव्यवहार

Fake-Vaccine
Fake-Vaccine

बीजिंग - कोरोनाची बनावट लस तयार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला चीनमध्ये अटक झाली असून लाखो डॉलरचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. अशा २० पेक्षा जास्त गुन्ह्यांबद्दल अटक करण्यात आलेल्या ७० व्यक्तींमध्ये त्याचा समावेश आहे.

या व्यक्तीचे नाव केवळ काँग असल्याचे सांगण्यात आले. क्षारयुक्त द्रव (सलाईन) आणि शुद्ध करण्यात आलेले पाणी (मिनरल वॉटर) यांचे मिश्रण त्याने सिरींजमध्ये भरले होते. विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या लसीच्या पॅकिंगचे त्याने सखोल संशोधन केले. त्याने ५८ हजारपेक्षा जास्त बनावट डोस बनविले आणि त्याचे पॅकिंग केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीन सरकारने बनावट लस तयार करणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली असून त्यांना जेरबंद करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अस्सल उत्पादकांच्या अंतर्गत यंत्रणेचा गैरवापर करून त्यांच्याकडून लस मिळवून विक्री करण्यात आली.
एका न्यायालयाच्या निकालानुसार काँग आणि त्याच्या टोळीने यातून एक कोटी ८० लाख युआन (२० लाख ७८ हजार डॉलर) इतकी कमाई केली. गेल्या ऑगस्टपासून ही टोळी सक्रिय होती.

असाही झाला घोटाळा

  • बनावट लसींची चढ्या दराने रुग्णालयांना विक्री
  • काही गुन्हेगारांनी स्वतःच लसीकरण उपक्रम राबविले
  • खेडेगावातील डॉक्टरांशी संगनमत करून लोकांना नकली डोस दिले
  • अशा डॉक्टरांच्या घरात किंवा मोटारीमध्ये लसीकरण

निर्यातीचे ठिकाण
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ६०० लसींची एक बॅच हाँगकाँगला पाठवण्यात आली. तेथून सागरी मार्गे निर्यात करण्यात आली, मात्र निर्यातीचे ठिकाण कोणते हे अद्याप नक्की समजू शकलेले नाही.

न्यायालयाचे आवाहन
दरम्यान, असे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय संस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सर्वोच्च लोकन्यायालयाने केले आहे. चीनने गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या चंद्र नववर्षाआधी एक अब्ज डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते, पण आतापर्यंत चार कोटी व्यक्तींचेच लसीकरण झाले आहे. असे असले तरी कडक लॉकडाऊन, चाचण्या आणि बाधित व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तींचा ठावठिकाणा शोधून त्यांची तपासणी अशा उपायांमुळे चीनने जागतिक साथीवर नियंत्रण मिळविले आहे.

उघडकीस गेल्या वर्षी, पण...
बहुतांश गैरप्रकार गेल्या वर्षाच्या अखेरीस उघड झाले, पण चीनच्या अधिकृत माहिती देण्याच्या एकूण पद्धतीनुसार त्याचा तपशील याच आठवड्यात जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बातम्या देणाऱ्या विश्वासार्ह संकेतस्थळांवरही अधिकृत सूत्रांचा उल्लेख नाही.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com