फोटोग्राफर फोटो बिघडवतो तेव्हा...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

मिसूरी (अमेरिका) - सध्या पर्स्नलाईज फोटोशुट करण्याचा ट्रेंड आहे. असे फोटोशुट्स करणाऱ्या फोटोग्राफर्सनाही मोठी मागणी आहे. मिसुरीतल्या एका कुटुंबाचे देखील काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. 

मिसूरी (अमेरिका) - सध्या पर्स्नलाईज फोटोशुट करण्याचा ट्रेंड आहे. असे फोटोशुट्स करणाऱ्या फोटोग्राफर्सनाही मोठी मागणी आहे. मिसुरीतल्या एका कुटुंबाचे देखील काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. 

मिसुरी मधील डेव्ह आणि पाम झरिंग यांनी आपल्या मुलांसोबतचे एक फोटोशुट करण्याचे ठरविले. त्यावेळी एका महिलेनी त्यांना संपर्क केला होता. आपण 'प्रोफेशनल फोटोग्राफर' असल्याचे तीने डेव्ह यांना सांगितले. त्यानंतर फोटोशुट साठी दिवस ठरविण्यात आला. या कुटुंबाचे फोटोशुट देखील व्यवस्थित पार पडले. त्यानंतर फोटो एडिट करुन देण्याचे या महिलेनी सांगितले. फोटोशुटसाठी तिने 250 डॉलर्स देखील या कुटुंबाकडून घेतले. परंतु, बरेच महिने झाले या महिलेनी डेव्ह यांच्याशी कोणतीही संपर्क केला नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाली असावी असा समज होऊन डेव्ह यांनी हा विषय सोडून दिला. 

या घटनेला अनेक महिने झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्या फोटोग्राफर महिलेने डेव्ह यांना पुन्हा संपर्क केला. फोटो एडिट करुन झाले असून, इमेलवरुन हे फोटो पाठविण्याचे तीने सांगितले. फोटो बघून मात्र सगळ्याना आश्चर्यच वाटले. आपले वडिलच आपली गंमत करत असल्याचे प्रथम मुलांना वाटले. परंतु, फोटोग्राफरनेच असे फोटो पाठविले असल्याचे कळाल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर फोटो कसे वाटले अशी विचारणा देखील या फोटोग्राफर महिलेने केली. तसेच काही अडचण आहे का असेही तीने विचारले. यावर आपल्याला फोटो खुपच आवडल्याचे आणि फोटो बघून आपण खूपच खूष झाल्याचे डेव्ह यांनी तिला सांगितले. त्यानंतर डेव्ह यांनी ''हा विनोद नसुन, मी या फोटोसाठी पैसे मोजले आहेत'' असे सांगत फोटो फेसबुकवर टाकले.

झालेला सगळा प्रकार देखील त्यांनी सोशल मिडियावर टाकला आहे. त्यानंर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटो पाहिल्यानंतर आपण कुटुंबासमवेत खूप हसत हे फोटो बघण्याचा आनंद घेतल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Paid $250 for “Professional Photoshoot” and This Is What They Got

टॅग्स