ट्रम्प यांचं फेअरवेल स्पीच; अखेरच्या भाषणात 'US कॅपिटॉल' हिंसेचा निषेध, पुढील प्रशासनाला सदिच्छा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

अमेरिकेमध्ये आज जो बायडन देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये आज जो बायडन देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं फेअरवेल स्पीच दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून या आपल्या शेवटच्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या हिंसेचा उल्लेख केला. तसेच त्यांनी या घटनेला अमेरिकेच्या मुल्यांच्या विरोधातील घटना असं म्हटलं.

हेही वाचा - युरोप देणार गरीब देशांना शिल्लक राहिलेली लस

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की कॅपिटॉल हिलवर याप्रकारे हल्ला झाल्याने प्रत्येक अमेरिकन नागरिक भयभीत झाला होता. ज्या मूल्यांच्या आधारवर आपण जगतो त्या सर्वच मूल्यांच्या विरोधात याप्रकारची राजकीय हिंसा आहे. या प्रकारच्या हिंसेला कधीच सहन केलं जाऊ शकत नाही. आता आपल्याला आधीपेक्षा अधिक एकजूट होऊन राहिलं पाहिजे. आपल्या शेवटच्या भाषणात ट्रम्प पुढे म्हणाले की, आम्ही चीनवर ऐतिहासिक व्यापार कर लावले, त्यासोबतच अनेक नवे करार केले. त्यामुळे आपली व्यापारी नीती गतीने बदलत गेली. त्यामुळेच अमेरिकेला अब्जावधी रुपये मिळाले. मात्र, कोरोना व्हायरस संकटाने आपल्याला दुसऱ्या दिशेबाबत विचार करण्यास भाग पाडले.

 

जो बायडन आज घेणार शपथ
जो बायडन आज अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वरुपात शपथ घेणार आहेत. जगातील महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या संयुक्त राज्य अमेरिकेची सत्ता बुधवारी अधिकृतरित्या रिपब्लिकन पक्षाकडून डेमोक्रॅटीक पक्षाकडे जाणार आहे. जो बायडन अमेरिकेचे सर्वांत वयस्कर तसेच 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. या शपथविधीच्या अनुषंगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी कडक सुरक्षा तैनात केली गेली आहे. गेल्या 6 जानेवारी रोजी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल हिलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या शपथविधीवर धोक्याचं सावट आहे. त्यामुळे हरतर्हेने खबरदारी घेतली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farewell address Trump celebrates his legacy extends best wishes to next administration