युरोप देणार गरीब देशांना शिल्लक राहिलेली लस

यूएनआय
Wednesday, 20 January 2021

सुमारे ४५ कोटी लोकसंख्या असलेल्या युरोपने आत्ताच तब्बल दोन अब्ज तीस कोटी इतक्या कोरोना लशी आहेत. यातून शिल्लक राहणाऱ्या लशी गरीब देशांना देण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे.

लंडन - सुमारे ४५ कोटी लोकसंख्या असलेल्या युरोपने आत्ताच तब्बल दोन अब्ज तीस कोटी इतक्या कोरोना लशी आहेत. यातून शिल्लक राहणाऱ्या लशी गरीब देशांना देण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युरोपने सहा कंपन्यांच्या लशी मिळविल्या आहेत. ज्या देशांना त्या दिल्या जातील तेथील नियामक संस्थेची मंजुरी मिळणे गरजेचे असेल, पण लवकरच याबाबतची यंत्रणा कशी राबवायची याची योजना जाहीर केली जाईल. शिल्लक लशी कोवॅक्स संस्थेला दिल्या जातील. त्यांच्यामार्फत गरीब देशांत वितरण केले जाईल, मात्र लशीची विक्री करायची की देणगी म्हणून द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. स्वीडनने शिल्लक लशी विकण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

'हिंसेचं समर्थन कदापि नाही'; मेलानिया ट्रम्प यांनी 'US फर्स्ट लेडी' म्हणून केलं शेवटचं भाषण

शेजारचे गरीब देश तसेच आफ्रिकेतील देशांना याचा लाभ होईल, मात्र त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) लसीकरणाच्या जागतिक योजनेवर परिणाम होऊ शकतो. डब्लूएचओने जगभर लशीचे योग्य प्रमाणात वितरण व्हावे म्हणून कोवॅक्सची स्थापना गेल्या वर्षी केली. ही संस्था सक्रिय झाली आहे, पण त्यांना पुरेशा प्रमाणात लस मिळविण्यात अडचणी येत आहेत.

इम्रान खान यांच्यावर प्रचंड दबाव; 31 जानेवारीपर्यंत देणार राजीनामा?

शिल्लक लशी आमच्या सीमेपलिकडील भागांत वाटाव्या असा प्रस्ताव आम्ही सदस्य देशांसमोर मांडणार आहोत. कोवॅक्स पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वी गरीब देशांना लस मिळणे यामुळे शक्य होईल. पश्चिमेकडील बाल्कन देश, उत्तर आफ्रिका आणि सहारा प्रदेशातील देशांना प्राधान्य मिळेल.
- स्टेला किरीयाकिडेस, युरोपीय महासंघाच्या आरोग्य आयुक्त

Edited By - Prashant Patil

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Europe give remaining vaccines poor countries stella kyriakides