esakal | ...म्हणून गाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

farmer decided to use a helicopter to airlift cow at switzerland video viral

एका गाईला दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते. पण, काही अडचणींमुळे तिच्यावर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. यामुळे शेतकऱयाने थेट हेलिकॉप्टरची मदत घेतली आणि तिच्यावर उपचार केले. शेतकऱयाचे कौतुक होत असून, गाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

...म्हणून गाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडनः एका गाईला दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते. पण, काही अडचणींमुळे तिच्यावर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. यामुळे शेतकऱयाने थेट हेलिकॉप्टरची मदत घेतली आणि तिच्यावर उपचार केले. शेतकऱयाचे कौतुक होत असून, गाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्वित्झरलँडमधील पर्वत भागातील ही घटना आहे. एका शेतकऱयाकडे असलेली गाय आजारी होती. शिवाय, लंगडत चालत होती. यामुळे उपचार करणे गरजेचे होते. अखेर, शेतकऱयाने हलिकॉप्टरची मदत घेतली. एअरलिफ्टच्या साहाय्याने गाईला उचलण्यात आले आहे. गाईला सुरक्षित स्थळी हलवून तिच्यावर उपचार करून घेतले. संबंधित घटना कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी शेतकऱयाचे कौतुक केले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनचा फोटो एबीसी न्यूजने ट्विटरवर शेअर करताना म्हटले आहे की, जेव्हा गाय उडू लागते. एका शेतकऱ्याने आपल्या गाईला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली. एल्प्स पर्वतांमध्ये फसल्याने गाईला दुखापत झाली. गाईला जास्त त्रासाचा सामना करावा लागू नये, म्हणून प्रसंगावधान दाखवून हेलिकॉप्टर बोलावून घेतले आहे.'

शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

loading image
go to top