
पैसा कमावण्यासाठी कोण कशी शक्कल लढवेल काही सांगता येत नाही. सध्या शेतीविषयक व्यवयासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यातही कृषिपर्यटन सारखे व्यवसाय अधिक वाढले आहेत. शहरातील लोकांचा विचार करून त्यांना ग्रामिण जीवन अनुभवता यावे असा यामागील उद्देश दिसून येतो.
अशीच एका शेतकऱ्याने भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. ती म्हणजे, त्याच्या शेतात वेळ घालवण्यासाठी लोक त्याला पैसे देतात. तेही एका तासाला 2500 रूपये इतके भाडे आहे. पण, लोक त्याला एवढे पैसे द्यायला कसे तयार होतात?, आणि लोक भाडे जास्त असूनही शेतात कसे जातात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
तर,त्याचं झालंय असं की, कोरोनाच्या काळात लोकांनी ऑक्सिजन सिलेंडर भरमसाठ किमतीत विकत घेऊन नातेवाईकांची कुटुंबातील ऍडमिट व्यक्तींची काळजी घेतली. त्यामूळे शुद्ध हवेची किंमत आपल्याला समजली आहे. याच माहामारीच्या काळात थायलंडमधील एका शेतकऱ्याला हि कल्पना सुचली. थायलंडमधील 52 वर्षीय शेतकरी दुसित यांची हेलफायर पास या परिसरात शेतजमीन आहे. हे ठिकाण शेतीसाठी ओळखले जाते.
या जमीनीत ते भातशेती करतात. शेतीशिवाय त्यांनी आपल्या शेतात कॅम्पिंग एरिया बनवला आहे. लोक इथे येतात, राहतात आणि मनसोक्त जेवणही करू शकतात. हे जगातील पहिले आणि एकमेव ठिकाण आहे जिथे लोकांना ताजी हवा मिळते, असा दावा या शेतकऱ्याने केला आहे. त्यामूळे या शेतात राहण्यासाठी 2500 रुपये आकारतो.
एशियन लाइफ सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे सेक्रेटरी असलेले शेतकरी दुसित त्यांच्या या अनोख्या शेतात येणाऱ्या लहान मुलांकडून आणि अपंग लोकांकडून पैसे घेत नाहीत. स्थानिक लोकांनाही सुट दिली जाते. या व्यवयासातून दुसित चांगला नफा कमावत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.