23 लाखांच्या कंबाइन गाडीतून आला नवरदेव; VIDEO होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fatehabad viral unique marriage groom reached in combine

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

23 लाखांच्या कंबाइन गाडीतून आला नवरदेव; VIDEO होतोय व्हायरल

हरियाणाच्या फतेहाबाद (Fatehabad) जिल्ह्यातील भादोलनवाली गावात एक अनोखा विवाहसोहळा पाहायला मिळाला. आतापर्यंत वधूंना घोडी, कार किंवा हेलिकॉप्टरमधून (Helicopter) वरात घेऊन जाताना लोकांनी पाहिले असेल, पण भादोलनवली या गावातील रहिवासी संदीप बैनीवाल यांनी आपल्या नववधूला २३ लाख रुपयांच्या कंबाइनवर (Combine)आणले. परिसरातील हे लग्न (Marriage) आज चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

हेही वाचा: Video: शेंगदाणाविक्रेत्याचा ‘कच्चा बादाम’, व्हायरल गाण्यामागची स्टोरी...

मिळालेल्या माहितीनुसार, भादोलनवली या गावचे रहिवासी संदीप बैनीवाल, दिवंगत पुत्र सुरेंद्र बैनीवाल यांचा विवाह सत्तार भट्टु येथील रहिवासी पूजासोबत निश्चित करण्यात आला होता. संदीप बारात घेऊन सत्तार भट्टूकडे गेला. सकाळी निरोप घेण्याची वेळ आली, तेव्हा फुलांनी सजवलेल्या गाडीची लोक वाट पाहू लागले, पण त्यावेळी सजवलेल्या गाडीऐवजी शेतात वापरल्या जाणाऱ्या कंबाइनवर डोली निघू लागल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कंबाइनवर निघाली नवरी

नववधूप्रमाणे कंबाइन सजवला होता. सजवलेल्या गाडीऐवजी शेतात वापरल्या जाणाऱ्या कंबाइनवर वधूला निरोप देण्यात आला. नवरदेवाच्या कुटुंबाच्या या उपक्रमाने गावातील लोक खूप प्रभावित झाले. शेतकरी कुटुंबाच्या या उपक्रमाचे खूप कौतुक होत आहे.

हेही वाचा: Video: समंथा चक्क एअरपोर्टवर नाचली अन् व्हायरल झाली

लग्नासाठी खरेदी केली 23 लाखाची कंबाइन

या कंबाइनवर शेतकरी आंदोलनाचे फलकही लागलेले दिसून येतयं. शेतकरी आणि शेतकऱ्याला आधार देण्यासाठी नवरदेव संदीपने गाडीऐवजी नववधूला एकत्र आणण्याचा निर्णय घेतला होता, असं नवरदेव संदीपच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. संदीपच्या घरच्यांनीही हा निर्णय मान्य केला. ज्यानंतर खास लग्नासाठी 23 लाख रुपयांमध्ये कंबाइन खरेदी करण्यात आलं.

Web Title: Fatehabad Viral Unique Marriage Groom Reached In Combine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social Mediaviralmarriage
go to top