
मुलगा वडिलांसोबत समुद्रात कयाकिंग करत असताना एका व्हेल माशानं त्याला गिळलं. वडिलांच्या डोळ्यादेखत व्हेल माशानं मुलाला गिळलं पण थोड्याच वेळात त्याला काही न करता पुन्हा बाहेर सोडलं. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चिली पेंटागोनियाजवळ ही घटना घडली. गेल्या शनिवारी ही घटना घडली असल्याची माहिती समजते.