
Donald Trump
sakal
पोर्टलँड : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेडरल न्यायालयाने दणका देताना पोर्टलँड येथे नॅशनल गार्डचे सैनिक पाठविण्याच्या त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. एखाद्या शहरामध्ये सैन्याला तैनात करणे अमेरिकेच्या राज्यघटनेविरोधात असून देशांतर्गत कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सैन्याचा वापर करणे कायदेसंमत नाही, असे युक्तिवाद ओरेगॉन प्रांताच्या वकीलांनी केला होता.