कतारमध्येही फडकणार सप्तरंगी झेंडे

पीटीआय
Thursday, 10 December 2020

फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा प्रथमच आखाती देशात होत आहे. कतारमध्ये होणाऱ्या स्पर्धेवेळी तृतीयपंथी-समलिंगी खेळाडूंना किंवा क्रीडाप्रेमींना मिळणाऱ्या संभाव्य वागणूकीबाबत शंका उपस्थित होत आहेत.

दोहा - रुढीप्रिय मुस्लिम देश असलेल्या कतारमध्ये २०२२ मध्ये फिफा विश्‍वकरंकड फुटबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेवेळी तृतीयपंथी-समलिंगी समुदायांचे प्रतीक असलेले सप्तरंगी झेंडे स्टेडियममध्ये फडकाविण्यास कतार सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे या कट्टर मुस्लिम देशात काही काळ सर्व समभावाचे वातावरण असणार आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा प्रथमच आखाती देशात होत आहे. कतारमध्ये होणाऱ्या स्पर्धेवेळी तृतीयपंथी-समलिंगी खेळाडूंना किंवा क्रीडाप्रेमींना मिळणाऱ्या संभाव्य वागणूकीबाबत शंका उपस्थित होत आहेत. कतारमध्ये या समुदायाविरोधात कायदे आहेत आणि त्यांची कडक अंमलबजावणी होते. या स्पर्धेवेळी मोठ्या प्रमाणावर विदेशांमधील फुटबॉलप्रेमी कतारमध्ये येऊ शकतात. त्यामध्ये समलिंगी व्यक्तींचे प्रमाणही मोठे असू शकते. इतर बहुतेक पाश्‍चात्य देशांमध्ये समलिंगी व्यक्तींवर बंधने नाहीत. त्यामुळे कतारमध्ये आल्यावर या चाहत्यांना स्थानिक कायद्यांचा त्रास व्हायला नको, यासाठी ‘फिफा’ आग्रही आहे. त्यामुळेच, स्पर्धा आयोजित करायची असल्यास हे कायदे बाजूला ठेवावे लागतील, असा इशारा ‘फिफा’ने दिला होता. व्यक्ती कोणीही असो, तिचा आत्मसन्मान कायम राखला गेलाच पाहिजे, असे ‘फिफा’चे म्हणणे आहे. कतारनेही फिफाच्या नियमांनुसार स्पर्धेचे आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. सप्तरंगी रंगाचा झेंडा हे जगभरात समलिंगी समुदायाचे चिन्ह बनले आहे. कतारमध्ये अनेक लोक ते समलिंगी असल्याचे लपवून ठेवतात, असा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. कतारने मात्र कोणालाही त्रास होनार नाही, याची हमी दिली आहे. आम्ही परंपरावादी देश असलो तरी इतरांचे स्वागत करणारेही आहोत, असे कतारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIFA World Cup in Qatar in 2022