अमेरिकेतील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढा : सीमा नंदा

The fight to keep America's democracy alive: Seema Nanda
The fight to keep America's democracy alive: Seema Nanda

वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) सूत्रे भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या सीमा नंदा यांनी स्वीकारली असून, आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक पोटनिवडणुकीत पक्षाला विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असा संदेश त्यांनी दिला. "अमेरिका या देशाचा आत्मा आणि येथील लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांवर असून, त्यासाठीच्या लढाईसाठी तयार रहा,'' असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

अमेरिकेतील मोठ्या राजकीय पक्षाच्या 'सीईओ'पदी नियुक्त होणाऱ्या नंदा या भारतीय- अमेरिकी समुदायातील पहिल्याच नागरिक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समितीच्या नियमित कामकाजाची जबाबदारी नंदा यांच्यावर आहे. पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या "सीईओ' म्हणून नंदा यांच्यासमोर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे. या निवडणुकीसाठीची धोरणे ठरविण्यात नंदा यांचा महत्त्वाचा सहभाग असणार आहे. 

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या नवनियुक्त "सीईओ' सीमा नंदा यांनी ट्रम्प प्रशासनाकडून लोकशाही मूल्यांचा गळा घोटला जात असल्याचा आरोपही केला. 
ट्रम्प यांचा 18 महिन्यांचा कार्यकाळ हा अमेरिकेसाठी प्रचंड अवघड होता. विद्यमान राजवट लोकशाहीच्या मुळावर उठली आहे, अशी सडकून टीका नंदा यांनी केली. 

ट्रम्प प्रशासनाकडून दररोज एका संस्थेला आव्हान दिले जात असून, अमेरिकेत लोकशाही धोक्‍यात आली आहे. 
- सीमा नंदा, डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या सीईओ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com