आता पाकिस्तानवर होणार 'फायनान्शियल स्ट्राईक'

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

- दहशतवादी कारवाया थांबत नसल्याने होणार ही कारवाई.

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईकची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही पाकिस्तानकडून दहशतवाद्या कारवाया काही केल्या थांबत नव्हत्या. त्यानंतर आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे भारतासह जगभरातील अनेक देशांनी ठरविले आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानवर 'फायनान्शियल स्ट्राईक' होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी कारवाया येत्या ऑक्टोबरपर्यंत न थांबल्यास इस्लामाबादला 'ब्लॅक लिस्ट' (काळ्या यादी) टाकण्यात येईल, असा इशारा आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) दिला आहे. जगभरातील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या विविध माध्यमांवर विशेष लक्ष ठेवण्याचे काम एफएटीएफकडून केले जाते. या संस्थेने जून 2018 मध्ये पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकले होते. 

दरम्यान, पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकल्यानंतर 27 निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पाकिस्तानवर कारवाई होण्याची शक्यता असून, येत्या काळात 'फायनान्शियल स्ट्राईक' होईल, असा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial Strike to be held in Pakistan Soon