esakal | कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसमध्ये आगीचे थैमान; 65 जणांचा होरपळून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

fire at Karachi Rawalpindi Tezgam express train today at Pakistan 65 dies

आग लागल्याचे समजताच पोलिस व अग्निशमन दलांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरवात केली आहे. इतर प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात येत आहे. काही प्रवाशांनी घाबरून रेल्वेबाहेर उडी मारली व त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसमध्ये आगीचे थैमान; 65 जणांचा होरपळून मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कराची : पाकिस्तानातील कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आज (ता. 31) पहाटे भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 65 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

बाळासाहेबांनी आम्हाला शब्द पाळायला शिकवलं, पण... : संजय राऊत

कराची-रावळपिंडी मार्गावर रहिम यार खान जवळ लियाकतपूर येथे ही भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच पोलिस व अग्निशमन दलांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरवात केली आहे. इतर प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात येत आहे. काही प्रवाशांनी घाबरून रेल्वेबाहेर उडी मारली व त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला कशामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच बचावकार्य सुरू झाले, पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांना वाचविण्यातही बऱ्याचशा अडचणी येत आहेत. सुरवातीला मृतांचा आकडा 10 वर होता, मात्र या भीषण आगीत आता 16 प्रवासी मृत्यूमुखी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, युद्धपातळीवर उपचार सूरू आहेत.