Imran Khan Political Career: क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड; जाणून घ्या इम्रान खान यांची कारकिर्द

Imran Khan Political Career
Imran Khan Political Career

Imran Khan Political Career: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानात राजकीय नेत्यांवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील असे प्रकार झाले आहेत.

2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते, भ्रष्टाचार संपवणे, देशाची अर्थव्यवस्था सुधारणे आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण तयार करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी सरकार स्थापन केले होते. मात्र तिन्ही आघाड्यांवर तो अपयशी ठरल्याने त्यांना पद सोडावे लागले. इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवण्यात आले. दरम्यान राजकारणात येण्यापूर्वी इम्रान खान हे यशस्वी क्रिकेटपटू राहिले आहेत. तो जगातील नावाजलेले अष्टपैलू खेळाडू मानले जातं. त्यांच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानने 1992 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. चला जाणून घेऊया कोण आहेत इम्रान खान…

इम्रान खान यांचा जन्म लाहोरचा

इम्रान खान यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1952 रोजी लाहोरमध्ये मियांवलीतील पश्तून कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव इक्रामुल्ला खान नियाझी आणि आईचे नाव शौकत खानम आहे. इम्रान हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्यांना चार बहिणी आहेत. इम्रानच्या पूर्वजांपैकी एक, हैबत खान नियाझी हे शेरशाह सूरीचे मुख्य सेनापती आणि पंजाबचे राज्यपाल होते. उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खानच्या कुटुंबातील दोन क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये जावेद बुर्की आणि माजिद खान यांचा समावेश आहे.

Imran Khan Political Career
Imran Khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबारात जखमी

ऑक्सफर्डमध्ये शिक्षण

लाहोरमध्ये वाढलेल्या इम्रान खान यांनी शहरातील अॅचिसन ​​कॉलेज आणि कॅथेड्रल स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवण्यात आले. त्यांनी वोर्सेस्टरमधील रॉयल ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. यानंतर, 1972 मध्ये, त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कॅबल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि येथून त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली. इम्रान अभ्यासात विशेष नव्हते, पण क्रिकेटच्या खेळपट्टीवर मात्र त्यांनी खूप यश मिळवलं.

Imran Khan Political Career
Sambhaji Bhide Controversy: ...तर मी कुंकू लावणार नाही; संभाजी भिडे प्रकरणावर शालिनी ठाकरे स्पष्टच बोलल्या

इम्रानची राजकीय कारकीर्द कशी आहे?

क्रिकेटच्या रस्त्यांवरून राजकारणाच्या कॉरिडॉरपर्यंतचा प्रवास इम्रानसाठी सोपा नव्हता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान यांनी 1996 मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाची स्थापना केली. पाकिस्तानच्या राजकारणातील पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांचे वर्चस्व संपवण्याचा इम्रानचा हेतू होता. यामुळेच इम्रान नेहमीच या दोन्ही पक्षांवर हल्लाबोल करत असतात.

मात्र, क्रिकेटमधून राजकारणात प्रवेश करताना इम्रानला लगेच यश मिळाले नाही. इम्रान 2002 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर जवळपास दशकभर त्यांच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही. मात्र, 2013 मध्ये इम्रान पुन्हा एकदा नॅशनल असेंब्लीवर निवडून आले. यावेळी निवडणुकीत पीटीआय दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला. इम्रान खान यांच्या पक्षाने खैबर पख्तूनख्वामध्ये जमात-ए-इस्लामीसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. मात्र, 2013 च्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पीएमएल-एनने हेराफेरी करून निवडणूक जिंकल्याचा आरोप इम्रानने केला होता.

इम्रानच्या हेराफेरीच्या आरोपांचा काहीही परिणाम झाला नाही आणि नवाझ शरीफ देशाचे पंतप्रधान झाले. यानंतर इम्रान त्याच्यावर अधिक हल्ले सुरू केले आणि नंतर ठिकठिकाणी रॅली काढू त्यांचा विरोध करत राहीले. इम्रानने ऑगस्ट 2014 मध्ये राजधानी इस्लामाबादमध्ये मोठी रॅली काढली होती. वाढता दबाव पाहून नवाझ शरीफ यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाची स्थापना केली. यानंतर इम्रान खान मागे हटले. त्याचवेळी जुलै 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आणि यावेळी इम्रानने सर्व तयारी केली होती. निवडणुकीत इम्रानचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आणि इम्रान यांनी युती करून सरकार स्थापन केले. इम्रान यांनी 18 ऑगस्ट रोजी 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले नेते ठरले आहेत, ज्यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इम्रान खान यांनी आपली खुर्ची वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीत (पाकिस्तान संसद) बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 172 खासदारांचा पाठिंबा त्यांना मिळवता आला नाही. अशा प्रकारे इम्रान यांचे सरकार गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com