Firing on Imran Khan: ..म्हणून इम्रान खान यांच्यावर गोळीबार केला; हल्लेखोरानं सांगितलं धक्कादायक कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firing on Imran Khan

Firing on Imran Khan: ..म्हणून इम्रान खान यांच्यावर गोळीबार केला; हल्लेखोरानं सांगितलं धक्कादायक कारण

Firing on Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तानात घडला. यादरम्यान इम्रानच्या दोन्ही पायात गोळी लागली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर हल्लेखोराला पोलिसांनी पकडले आहे.

इम्रान खान यांच्यावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीने पाकिस्तानी वाहिनीशी संवाद साधला. यावेळीत त्याने सांगितले की , इम्रान खान देशाची दिशाभूल करत आहेत. ते त्यांच्या रॅलीमध्ये फक्त गोंगाट करत आहेत. अजानच्या वेळीही लाऊडस्पिकर वाजवून आवाज केला जात आहे. याचा राग येऊन मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मला फक्त इम्रान खान यांना मारायचे होते. मला कोणीही पाठवले नाही. मी एकटा आहे आणि जे काही घडले त्याला मी जबाबदार आहे.

जखमी झाल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले की, अल्लाहने मला दुसरे जीवन दिले आहे. या हल्ल्यात पीटीआयचे खासदार फैसल जावेद हेही जखमी झाले आहेत. त्याचवेळी हल्लेखोराचे फोटोही समोर आले आहे. तो बंदूक रोखून गोळीबार करताना दिसत आहे.

हेही वाचा: Imran Khan Political Career: क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड; जाणून घ्या इम्रान खान यांची कारकिर्द

हेही वाचा: Sambhaji Bhide Controversy: ...तर मी कुंकू लावणार नाही; संभाजी भिडे प्रकरणावर शालिनी ठाकरे स्पष्टच बोलल्या

या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अनेक ट्विट करून हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या घटनेचा तातडीने अहवाल देण्याचे आदेश गृहमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो. ते म्हणाले, या घटनेची चौकशी व्हावी यासाठी सरकार पंजाब सरकारला पूर्ण मदत करेल. देशाच्या राजकारणात हिंसेला स्थान नसावे.

टॅग्स :PakistanPM Imran Khan