esakal | रुग्ण स्वत:च करू शकणार कोरोना टेस्ट; 30 मिनिटात मिळेल रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

corona kit.

अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

रुग्ण स्वत:च करू शकणार कोरोना टेस्ट; 30 मिनिटात मिळेल रिपोर्ट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने व्यक्तीला स्वत: कोरोना चाचणी घेता येईल अशा किटच्या वापराला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या किटमुळे केवळ 30 मिनिटामध्ये रिझल्ट मिळू शकणार आहे. 

लुसिरा आरोग्यने बनवलेल्या या किटच्या आपातकालीन वापरला परवानगी मिळाली आहे. यामध्ये नाकामधील स्त्रावाच्या सँपलद्वारे चाचणी घेतली जाते. 14 वर्षांच्या पुढील व्यक्ती याचा वापर करु शकतील. किटचा एकदाच वापर शक्य असून कोरोनाची लक्षणे दिसून येत असलेल्यांना याचा फायदा होऊ शकतो. कोरोना लशीसंबंधी ही पहिली अशी किट आहे, जिचा वापर घरच्याघरी केला जाऊ शकतो, असं एफडीएचे कमीशनर स्टिफन हान म्हणाले आहेत. 

पाकिस्तानची माणुसकी! कराची विमानतळावर भारतीय विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगला दिली...

हॉस्पिटलमध्येही या किटचा वापर केला जाऊ शकतो. केवळ 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची डॉक्टरांनी चाचणी घेणे आवश्यक आहे, असं एफडीएकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, अमेरिकेत कोरोना महामारीने अक्षरश: थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहे. आतापर्यंत अमेरिकमध्ये 1.1 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर या विषाणूमुळे 1.35 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली असून दिड ते दोन लाखांच्या दरम्यान कोरोना रुग्ण सापडत आहेत. अमेरिका कोरोनाने सर्वाधिक प्रभावी देश ठरला आहे. 

loading image
go to top