esakal | कराची विमानतळावर भारतीय विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगला दिली परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

go air india.

कितीही शत्रुत्व असलं तरी मानवतेचा धर्म सर्वात आधी येतो.

कराची विमानतळावर भारतीय विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगला दिली परवानगी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कराची- कितीही शत्रुत्व असलं तरी मानवतेचा धर्म सर्वात आधी येतो. अनेकवेळा शत्रूकडूनही तो निभावला जातो. भारत आणि पाकिस्तानमधून विस्तवही जात नाही,  अशावेळी पाकिस्तानकडून मंगळवारी उदारपणा पाहायला मिळाला आहे. रियादवरुन दिल्लीला जाणाऱ्या भारतीय एअरलाईन्सच्या गो-एअर विमानाला आपातकालीन स्थितीत कराची विमानतळावर उतरवावे लागले होते. विशेष म्हणजे पाकिस्तानने मोठ्या मनाने विमान लँड करण्याची परवानगी दिली होती. 

गो-एअर विमान  G8- 6658A रियादवरुन दिल्लीला जात होते. अशावेळी एका प्रवाशाला कार्डिएक अरेस्ट पडला. त्यामुळे विमानाला तात्काळ लँड करणे आवश्यक होते. यावेळी पाकिस्तान विमानतळ प्रशासनाने मानवीय आधारावर विमानाला उतरण्याची परवानगी दिली. मिळालेल्या माहितीनुसार एका 30 वर्षीय व्यक्तीला विमानात असतानाच कार्डिएक अरेस्ट आला. त्यामुळे विमान तात्काल लँड करावे लागले. हा व्यक्ती उत्तर प्रदेशच्या बरेलीचा राहणारा असल्याचं सांगण्यात येतंय.

बॉलिवूड अभिनेता इम्रान खानचा चित्रपटसृष्टीला रामराम; मित्राने केला खुलासा

व्यक्ती विमानात बेशुद्ध झाला होता, त्यानंतर आपातकालीन लँडिंग करण्यात आली. विमानतळावर डॉक्टरांनी व्यक्तीला मृत घोषित केले. त्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. मृत प्रवाशाच्या बाबतचे डिटेल्स देण्यात आलेले नाहीत. दरम्यान, हाडवैरी असले तरी मानवतेचा धर्म सर्वात मोठा असल्याचं उदाहरण पाकिस्तानने समोर ठेवलं आहे. 

loading image