अबब ! पहिल्याच दिवशी तब्बल एवढ्या मुलांचा जन्म

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात जगभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जगभरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी 3,95,000 बालकांनी जन्म घेतला आहे. यापैकी भारतात 69,944 बालकांनी जन्म घेतला असून हा आकडा जगात स‌र्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात जगभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जगभरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी 3,95,000 बालकांनी जन्म घेतला आहे. यापैकी भारतात 69,944 बालकांनी जन्म घेतला असून हा आकडा जगात स‌र्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे.

भारतापाठोपाठ चीनमध्ये जवळपास 44940 बालकांचा जन्म झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर नायजेरियामध्ये 25,685, पाकीस्तानमध्ये 15112, इंडोनेशियामध्ये 13256, अमेरिकेत 11086 बालकांनी जन्म घेतला असल्याचे युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे. 

2019 मध्ये युनिसेफच्या बालहक्क करार स्वीकाराचा तिसावा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने युनिसेफच्यावतीने जगभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात  येणार आहेत. युनिसेफच्या कार्यकारी उपसंचालक पेट्री गॉर्निझ्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण प्रत्येक मुलाला जन्मानंतर जगण्याचा हक्क बहाल करण्याचा संकल्प करायला हवा. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात  एकूण 3,95,072 बालकांचा जन्म झाला. यांपैकी 98,768 मुलं ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On first day of 2019, estimated 395,000 babies born worldwide