esakal | लस घेणारे 'फर्स्ट मॅन' विल्यम शेक्सपिअर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

लस घेणारे 'फर्स्ट मॅन' विल्यम शेक्सपिअर यांचे निधन

लस घेणारे 'फर्स्ट मॅन' विल्यम शेक्सपिअर यांचे निधन

sakal_logo
By
सूरज यादव

लंडन - जगात कोरोनाने गेल्या दीडेक वर्षापासून थैमान घातलं असून सध्या यावर प्रतिबंधक लस अनेक देशांमध्ये दिली जात आहे. कोरोनावरची ही लस देण्यात आलेल्या सर्वात पहिल्या पुरुषाचे निधन झालं आहे. कोरोनावरील लस घेणारा जगातील पहिला पुरुष म्हणून ते चर्चेत राहिलेच पण त्याशिवाय नावामुळेही त्यांची खूप चर्चा झाली. विल्यम शेक्सपिअर असं नाव असलेल्या 81 वर्षीय व्यक्तीचं निधन झालं. त्यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फायजरची लस देण्यात आली होती. त्यांना दुसऱ्या एका आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्या अगोदर काही मिनिटे युनिव्हर्सिटी रुग्णालयाने 91 वर्षीय मार्गारेट कीनन यांना लस दिली होती.

शेक्सपिअर यांचे मित्र जेने इन्स यांनी विल्यमचे निधन झाल्याचं सांगितलं. विल्यम अनेक गोष्टींसाठी ओळखला जाईल. ज्यामध्ये जगातील तो पहिला पुरुष होता ज्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतली. सर्वांनी लस घेणं हीच त्याला सर्वात चांगली श्रद्धांजली ठरेल.

हेही वाचा: रामदेव बाबा अडचणीत, IMA नं पाठवली 1 हजार कोटींची मानहानीची नोटीस

युनिव्हर्सिटी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेक्सपिअर यांचे निधन स्ट्रोकमुळे झाले. शेक्सपिअर हे नगरसेवकसुद्धा होते. त्यांनी ज्या रुग्णालयात लस घेतली तिथेच अखेरचा श्वास घेतला. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं होतं.

वेस्ट मिडलँड्स लेबर ग्रुपने म्हटलं की, शेक्सपिअर यांना बिल नावानेही ओळखलं जात होतं. कोरोनाची लस घेतल्यानंतर जागतिक स्तरावर त्यांचे नाव प्रकाशझोतात आले. पक्षासाठी त्यांनी अनेक दशकं काम केलं. विल्यम यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.