पाकिस्तानात पहिल्यांदा मिळाला ट्रान्सजेंडरला वाहनपरवाना

वृत्तसंस्था
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

''वाहनपरवाना मिळावा यासाठी इस्लामाबाद पोलिस कार्यालयात गेली होती. तेव्हा मी माझ्याय अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर पोलिसप्रमुखांनी वाहनपरवाना देण्याबाबत आश्वासन दिले होते. पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात गेल्यानंतर वाहनपरवाना मिळाला. वाहनपरवाना मिळाल्याने मी अत्यंत आनंदित आहे''. 

- लैला अली, ट्रान्सजेंडर

इस्लामाबाद : पाकिस्तानात पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरला वाहनपरवाना देण्यात आला आहे. इस्लामाबाद वाहतूक पोलिसांनी ट्रान्सजेंडर लैला अली यांना हा वाहनपरवाना दिला आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरला वाहनपरवाना मिळालेली लैला अली ही पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरली आहे. इस्लामाबादच्या पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयाने याबाबतची दखल घेतली होती. त्यानंतर लैला अलीला हा वाहनपरवाना देण्यात आला आहे.

लैला अली यांचे नाव त्यांच्या मतदान ओळखपत्र आणि वाहनपरवान्यावर मोहम्मद अली असे नाव देण्यात आले आहे. लैला अली या दहा वर्षांपासून विनापरवाना वाहन चालवत आहेत. त्यांना आज अखेर वाहतूक विभागाकडून वाहनपरवाना मिळाला. त्यावर लैला अली म्हणाल्या, ट्रान्सजेंडर असल्याने वाहनपरवाना मिळत नव्हता. त्यामुळे वाहन चालवताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, वाहनपरवाना नसतानाही मी गेल्या दहा वर्षांपासून वाहन चालवत आहे.  

पोलिसप्रमुखांनी लक्ष दिल्यामुळे घेण्यात आली दखल

लैला यांनी सांगितले, की ''वाहनपरवाना मिळावा यासाठी इस्लामाबाद पोलिस कार्यालयात गेली होती. तेव्हा मी माझ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर पोलिसप्रमुखांनी वाहनपरवाना देण्याबाबत आश्वासन दिले होते. पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात गेल्यानंतर वाहनपरवाना मिळाला. वाहनपरवाना मिळाल्याने मी अत्यंत आनंदित आहे''. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Time In Pakistan Transgender gets licence